Astrology: ‘या’ तीन राशींना मिळणार ‘लग्झरी लाईफ’; तुमची रास यात आहे काय?

पत्रिकेतील ग्रह (Astrology) हे माणसाच्या आयुष्याचे अनुमान सांगतात तर गोचर ग्रह (Gochar Planet) हे त्याचा रोजचा दिवस किंवा पुढचा काळ कसा असेल हे सांगतात. पत्रिकेतील ग्रहांप्रमाणेच गोचर ग्रह देखील परिणामकारक असतात आणि त्यामुळे माणसाच्या जीवनातील भाग्य, सुख, नाश, संकट यांचा अंदाज लावता येतो. माणसाच्या आयुष्यातील परिस्थिती काळानुरूप बदलते. त्याच्या पत्रिकेतील ग्रह आणि गोचर ग्रहांवरून अनेक […]

Astrology: 'या' तीन राशींना मिळणार 'लग्झरी लाईफ'; तुमची रास यात आहे काय?
आजचे राशी भविष्य
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 9:53 AM

पत्रिकेतील ग्रह (Astrology) हे माणसाच्या आयुष्याचे अनुमान सांगतात तर गोचर ग्रह (Gochar Planet) हे त्याचा रोजचा दिवस किंवा पुढचा काळ कसा असेल हे सांगतात. पत्रिकेतील ग्रहांप्रमाणेच गोचर ग्रह देखील परिणामकारक असतात आणि त्यामुळे माणसाच्या जीवनातील भाग्य, सुख, नाश, संकट यांचा अंदाज लावता येतो. माणसाच्या आयुष्यातील परिस्थिती काळानुरूप बदलते. त्याच्या पत्रिकेतील ग्रह आणि गोचर ग्रहांवरून अनेक अंदाज मांडले जाऊ शकतात. सर्वांचे राशिचक्र भिन्न असतात आणि ग्रह नक्षत्रांच्या बदलत्या हालचालींचा देखील जीवनावर प्रभाव पडत असतो. घरांच्या शुभ व अशुभ स्थानानुसार माणसाला फळ मिळते. ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीवरून येणाऱ्या काळाचा अंदाज बांधता येतो. आज आपण अशा तीन राशीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना येणाऱ्या काळात  खूप मोठा फायदा होणार आहे, याशिवाय ते ‘लग्झरी लाईफ’ अनुभवातील.

  1. मेष रास- परिस्थितीवर नियंत्रण येऊन चिंता नाहीशी होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखाद्या समारंभात मैत्रीचे नवे धागे जोडले जातील. विशुद्ध प्रेमाचा अनुभव मिळणार आहे. त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा. समाधानकारक परिणामांसाठी कामाचे आयोजन नीट करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताण-तणाव असेल. इतरांना मदत करण्यासाठी वेळ आणि शक्ती खर्च करा. पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबुड करू नका. तुमचा जोडीदार तुमच्यासाठी काहीतरी खास खरेदी करेल.
  2. सिंह रास- मानसिक शांततेसाठी तणाव दूर करा. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे प्राप्त होईल. ज्ञान आणि विनोदबुद्धीमुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. हे दिवस उच्च कामगिरीचे आणि उच्च वर्तुळात वावरण्याचे आहेत. अनेक असे विषय प्रश्न उद्भवतील ज्याकडे ताबडतोब लक्ष देणे गरजेचे आहे. चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो. पण बसून चर्चा केल्यामुळे सर्व काही ठीक होईल.
  3. मकर रास- चांगल्या गोष्टी घेण्याकडे मनाचा कल राहील. तुमचा व्यर्थ खर्च पाहून आई-वडील चिंतीत होऊ शकतात. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र किंवा मैत्रीण पुढाकार घेण्याची शक्यता आहे. तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमवण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्याल. आपण आपल्या मालकीच्या वस्तू बाबत निष्काळजी असाल तर त्या हरवू अथवा चोरी होऊ शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.