AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : काय असते देव, मनुष्य आणि राक्षस गण? लग्न ठरवतांना केला जातो विचार

साधारणत: राक्षस गण हे नाव ऐकल्यावर लोकांच्या मनात राक्षसाची प्रतिमा येते. राक्षस गटातील लोकांबद्दल वाईट मत तयार केले जाते. पण तसे अजिबात नाही.

Astrology : काय असते देव, मनुष्य आणि राक्षस गण? लग्न ठरवतांना केला जातो विचार
जोतिषशास्त्रात गणाची माहितीImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 18, 2023 | 9:41 AM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) व्यक्तीच्या 3 गणांबद्दल सांगण्यात आले आहे. पत्रिकेत व्यक्तीचे हे गण त्याचा स्वभाव, वैशिष्ट्य आणि दोष यांची गणना करतात. हे 3 गण म्हणजे देव, मानव आणि राक्षस गण. साधारणत: राक्षस गण हे नाव ऐकल्यावर लोकांच्या मनात राक्षसाची प्रतिमा येते. राक्षस गटातील लोकांबद्दल वाईट मत तयार केले जाते. पण तसे अजिबात नाही. देव गण हा तीन गणांमध्ये श्रेष्ठ मानला जातो, पण तिन्ही गणांचे स्वतःचे वैशिष्ट्ये आहे. चला जाणून घेऊया गणानुसार व्यक्तीमध्ये कोणते गुण आढळतात.

गणाचे तीन प्रकार आणि त्याचे वैशिष्ट्य

  1. देव गण : ज्योतिषांच्या मते देव गणाचे लोक सर्वोत्तम मानले जातात. देव गणाच्या लोकांमध्ये देवांच्या प्रती गुण असतात. हे लोक चांगले वागणारे, प्रामाणिक, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कृत, कोमल मनाचे, दयाळू, बुद्धिमान आणि अतिशय सकारात्मक विचारसरणीचे असतात. हे लोकं धर्माकडे खूप लक्ष देतात आणि परोपकारावरही विश्वास ठेवतात. हे लोकं नेहमी इतरांच्या मदतीसाठी पुढे असतात.
  2. मानव गण : ज्योतिषशास्त्रात मानव गणाच्या लोकांबद्दल असे म्हटले जाते की हे लोकं मेहनती असतात. ते त्यांच्या मेहनतीच्या जोरावर प्रगती करतात आणि भरपूर पैसा कमावतात. जीवनात सन्मान मिळवतात. हे लोकं अतिशय काळजीपूर्वक कार्य करतात.
  3. राक्षस गण : राक्षस गणाचे लोकं सामान्यतः खूप नकारात्मक असतात. पण त्यांनी प्रयत्न केल्यास ते स्वतःला सकारात्मक बनवू शकतात. राक्षस गणाच्या लोकांची एक खासियत असते की त्यांना नकारात्मक गोष्टी आणि घटना लवकर कळतात. निर्भय आणि धैर्यवान असल्याने ते प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जातात. हे लोकं स्पष्ट आणि कडवट बोलतात.

ज्योतिषी म्हणतात की देव आणि राक्षस गणाच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये. कारण या दोघांच्या स्वभावात खूप फरक आहे. त्यामुळे त्यांना स्थिरावता येत नाही. देव गणाच्या लोकांसाठी मानुष्य गणाचा जीवनसाथी सर्वोत्तम असतो. तर मानव गणाचे लोकं देव आणि दानव या दोघांशी विवाह करू शकतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.