Baba Vanga : वाईट दिवस सरले, आता फक्त सुखच सुख, या राशींच्या आयुष्यात घडणार चमत्कार, बाबा वेंगांनी आधीच सांगितलंय
जेव्हा -जेव्हा जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्यांची चर्चा होते, त्यामध्ये बाबा वेंगा यांचं नाव सर्वात आघाडीवर असतं. 2025 मध्ये काही राशींचं भाग्य चमकणार असून, त्यांना अनेक संधी मिळणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलं आहे.

जेव्हा -जेव्हा जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्यांची चर्चा होते, त्यामध्ये बाबा वेंगा यांचं नाव सर्वात आघाडीवर असतं. बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये जगात घडणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घटनांसंदर्भात भाकीतं करून ठेवली आहेत, त्यांची ही भाकीत आज खरी ठरत असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतो. बाबा वेंगा यांची जी भाकीतं खरी ठरली त्यामध्ये जपानमध्ये आलेली त्सुनामी, हिटलरचा मृत्यू, इंग्लंडच्या राणीचा मृत्यू , अमेरिकेवर झालेला हल्ला अशा अनेक भविष्यवाणींचा समावेश आहे. हे भाकीतं बाबा वेंगा यांनी या सर्व घटना घडण्यापूर्वीच केले होते, असा दावा करण्यात येतो.
बाबा वेंगा यांचा जन्म बग्लेरियामध्ये 1911 साली झाला, तर मृत्यू 1996 साली झाला, बाबा वेंगा यांच्याबाबत अशी देखील एक मान्यता आहे की, लहानपणी त्या एका वादळात सापडल्या होत्या, त्यामुळे त्यांना आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमवावी लागली. त्यानंतर त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. त्यांनंतर त्यांनी अनेक भविष्यवाणी केल्या, त्या आजही खऱ्या ठरत असल्याचा दावा केला जातो.
दरम्यान बाबा वेंगा यांनी 2025 वर्षांसंदर्भात काही भयावह भाकीतं वर्तवली होती आणि त्यांची ही भाकीत खरी ठरत असल्याचं दिसत आहे. 2025 मध्ये जगाच्या अंताला सुरुवात होईल, जगावर युद्धाचं मोठं संकट असेल, अनेक देशांमध्ये भूकंप येतील, महापुराचं संकट आहे. याचा सर्वाधिक फटका हा पश्चिमेकडील देशांना बसेल असं भाकीत बाबा वेंगा यांनी वर्तवलं होतं, ते आता खरं ठरताना दिसत आहे. जपानसह अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराण आणि इस्रायलमध्ये मोठं युद्ध झालं, तर अमेरिकेला पुराचा तडाखा बसला आहे. दरम्यान बाबा वेंगा यांनी चार राशींबद्दल मोठं भाकीत वर्तवलं आहे. 2025 च्या मध्यापासून तीन राशींचे चांगले दिवस सुरू होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे, या राशी नेमक्या कोणत्या आहेत? त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
मेष – बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या भाकीतानुसार मेषा राशीला जुलै 2025 पासून काही मोठ्या संधींची प्राप्ती होणार आहे, या संधी अशा असतील की ज्यामुळे या राशींच्या लोकांचं आख्ख आयुष्यच बदलणार आहे. या काळात या राशीचे लोक करिअरमध्ये मोठी झेप घेणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तुळ – 2025 च्या मध्यापासून या राशीचे चांगले दिवस सुरू होणार आहेत, अनेक नवीन संधी या लोकांना मिळणार आहेत, या लोकांचं नशीब चमकणार आहे, असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.
सिंह – जुलै 2025 मध्ये या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळणार आहे, या राशीच्या लोकांचं नशीब चमकणार आहे, एक सकारात्मक ऊर्जा या लोकांमध्ये निर्माण होणार आहे, आयुष्यातील एखादी मोठी गोष्ट त्यांना या काळात मिळू शकते, असा दावा बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या भाकीतानुसार करण्यात आला आहे.
