AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga predicts : ‘राजकारणात मोठी उलथापालथ होणार’; या पक्षाबद्दल बाबा वेंगांचं मोठं भाकीत

जगात अनेक भविष्यवेत्ते होऊन गेले. त्यातील अनेक जण त्यांनी वर्तवलेल्या भाकीतांमुळे जगप्रसिद्ध आहेत. यामध्ये बाबा वेंगा यांचा देखील समावेश होतो. त्यांनी राजकारणाबद्दल देखील मोठी भविष्यवाणी केली आहे.

Baba Vanga predicts : 'राजकारणात मोठी उलथापालथ होणार'; या पक्षाबद्दल बाबा वेंगांचं मोठं भाकीत
Baba VengaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 08, 2025 | 6:42 PM
Share

जगात अनेक भविष्यवेत्ते होऊन गेले. त्यातील अनेक जण त्यांनी वर्तवलेल्या भाकीतांमुळे जगप्रसिद्ध आहेत. यामध्ये बाबा वेंगा यांचा देखील समावेश होतो. बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये शेकडो वर्षांनंतर जगात कोणत्या घटना घडतील याचं भविष्य वर्तवलं आहे. काही जणांकडून असा दावा देखील केला जातो की बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या काही घटना या खऱ्या ठरल्या आहेत. ज्यामध्ये अमेरिकेवर झालेला हल्ला, तसेच हिटलरचा मृत्यू अशा काही घटनांचा समावेश आहे.दरम्यान बाबा वेंगा या एका वादळात सापडल्या होत्या, वादळात सापडल्यामुळे त्यांनी आपली दृष्टी गमावली त्यानंतर त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाल्याचा दावा देखील केला जातो. बाबा वेंगा यांना बाल्कनचा नॅस्ट्रोडॅमस असं देखील म्हटलं जातं. त्यांचा जन्म बल्गेरियामध्ये झाला.

दरम्यान बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये काही राजकीय भाकीतं देखील केली आहेत. 2076 पर्यंत पुन्हा एकदा संपूर्ण जगावर कम्युनिस्टांची राजवट येईल असं भाकीत बाबा वेंगा यांनी वर्तवलं आहे.2076 पर्यंत जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळेल.जगभरात हळूहळू साम्यवाद आणि समाजवादाचा प्रभाव वाढेल. एक दिवस असा येईल की त्यावेळी संपूर्ण जगावर कम्युनिस्टांचं राज्य असेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. जेव्हा जगात कम्युनिस्टांची सत्ता येईल तेव्हा भांडवलशाही दूर होऊन समानता वाढेल असंही बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.

बाबा वेंगा यांनी 2025 या वर्षाबद्दल देखील मोठं भाकीत वर्तवलं आहे. या वर्षामध्ये जगावर अनेक संकटं येतील, महापूर, भूकंप आणि युद्धा सारख्या संकटांचा सामना करावा लागले, पूर्वेकडी देशांमध्ये युद्ध होतील परंतु त्याचा परिणाम हा पश्चिमेकडील देशांवर देखील होऊ शकतो. तसेच महापुरासारखे संकट देखील या काळात येतील. अनेक ठिकाणी महाप्रलयंकारी भूकंप होतील अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी 2025 बद्दल केली आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.