AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hrithik Roshan Birthday Zodiac | बॉलीवूडचा स्टार हृतिक रोशनची रास तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या तुमच्या सुपर हिरोच्या राशीबद्दल सर्व काही

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन याचा वाढदिवस. भारतातील प्रत्येक तरुणाला त्याच्यासारखी बॉडी बनवी असं स्वप्न असतं. त्याची जबरदस्त पर्सनॅलिटी सर्वांनाच आकर्षित करत असते. हृतिक रोशनचे चाहते फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभारात आहेत.

Hrithik Roshan Birthday Zodiac | बॉलीवूडचा स्टार हृतिक रोशनची रास तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या तुमच्या सुपर हिरोच्या राशीबद्दल सर्व काही
Hrithik Roshan
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Jan 10, 2022 | 2:33 PM
Share

मुंबई : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन याचा वाढदिवस. भारतातील प्रत्येक तरुणाला त्याच्यासारखी बॉडी बनवी असं स्वप्न असतं. त्याची जबरदस्त पर्सनॅलिटी सर्वांनाच आकर्षित करत असते. हृतिक रोशनचे चाहते फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभारात आहेत. त्याला जागतिक सुपरस्टार मानले जाते. पण या सुपरस्टारची रास कोणती आहे हे तुम्हाला माहीत आहे का ? हृतिक हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध मकर राशींपैकी एक आहे.

22 डिसेंबर ते 19 जानेवारी दरम्यान जन्मलेले लोक मकर राशीचे आहेत. मकर तार्किक, व्यावहारिक आणि बुद्धिमान असतात. ते प्रेरित आणि महत्वाकांक्षी आहेत आणि जीवनात त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास तयार असतात. मकर राशींमध्ये बरेच आत्म-नियंत्रण असते आणि कधी लक्ष केंद्रित करायचे आणि कधी सोडले पाहिजे हे माहित असते.

हृतिक रोशनमध्ये मकर राशीराशीचे कोणते गुणधर्म आहेत ?

महत्वाकांक्षी मकर राशीचे लोक महत्त्वाकांक्षी असतात. मकर राशीचे व्यक्ती मेहनती आहेत. त्यांना माहित आहे की काहीतरी महान साध्य करण्यासाठी त्यांना अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. ते शिस्तबद्ध आणि धीरगंभीर असतात आणि गरज पडल्यावर स्वतःला पुढे नेण्याची क्षमता त्यांच्यात असते. बॉलीवूडमध्ये प्रवेश केल्यापासून हा अभिनेता महत्त्वाकांक्षी आहे यात शंका नाही. या स्टार- किडने 1980 मध्ये ‘ आशा’ या चित्रपटातून वयाच्या 6 व्या वर्षी पदार्पण करून अभिनयाची आवड जोपासण्यास सुरुवात केली . आज तो भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे तो फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी 100 मध्ये देखील दिसला आहे.

शिस्त मकर राशींचे लोक शिस्तप्रिय असतात.या राशीचे लोक अविश्वसनीयपणे निष्ठावान आणि त्यांच्या नातेसंबंधासाठी समर्पित असतात. ते एक वचनबद्ध व्यक्ती आहेत जे आपल्या प्रियजनांच्या इच्छा पूर्ण करतात. हा अभिनेता शिस्तबद्ध जीवनशैलीमुळेच ओळखला जातो. त्याला व्यायामाची खूप सवय आहे. एका मासिकाच्या मते हृतिक रोशनला जगातील दुसरा सर्वात सेक्सी माणूस म्हणून ओळख दिली आहे.

लाजाळू एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत, हृतिकने कबूल केले की त्याच्या बालपणीचा बराचसा काळ एकाकीपणात घालवला. बहुतेक वेळा त्याला असुरक्षित वाटायचे, त्याच्याकडे असणाऱ्या अतिरिक्त अंगठ्याच्या वेगळेपणामुळे बालपणातील बहुतेक वेळा तो एकट्याच असायचा.

मूडी मकर राशीचे लोक खूप संवेदनशील असतात. मकर राशींच्या व्यक्तींचा मुड प्रत्येक सेकंदाला बदलू शकतो ज्यामुळे त्यांना समजणे कठीण होते. हृतिकच्या डान्सच्या स्टेप्स प्रमाणेच त्याचे मूडसुद्धा बदलू शकतात.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

Chanakya Niti : ही 5 लक्षणं म्हणजे, आर्थिक संकटाची घंटा! आताच तपासून पाहा

तुमच्या घरात ही पेंटिंग आहेत तर आताच काढा नाहीतर…

Drawing Room Vastu | ड्रॉईंग रूममधील वस्तू योग्य दिशेला ठेवा , नाहीतर आर्थिकनुकसान नक्की

Follow Us
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...