Dream remedy | स्वप्न देतात शुभ – अशुभ संकेत, वाईट स्वप्न पाहिल्यावर काय उपाय कराल

दिवसभराचा संपुर्ण थकवा दूर करण्यासाठी आपण झोपतो, पण यावेळी देखील आपल्या विचाऱ्यांचे चक्र सुरुच असते. काही जणांच्या मते आपण दिवसभर जे विचार करतो अवचेतन मन (subconscious mind) साठवून ठेवते आणि झोपल्यानंतर आपल्याला त्या विचारांचा एक संच दिसतो. त्यामुळेच कदाचित काही स्वप्नाचा संदर्भ आपल्याला लागत नाही.

Dream remedy | स्वप्न देतात शुभ - अशुभ संकेत, वाईट स्वप्न पाहिल्यावर काय उपाय कराल
dream

मुंबई : दिवसभराचा संपुर्ण थकवा दूर करण्यासाठी आपण झोपतो, पण यावेळी देखील आपल्या विचाऱ्यांचे चक्र सुरुच असते. काही जणांच्या मते आपण दिवसभर जे विचार करतो अवचेतन मन (subconscious mind) साठवून ठेवते आणि झोपल्यानंतर आपल्याला त्या विचारांचा एक संच दिसतो. त्यामुळेच कदाचित काही स्वप्नाचा संदर्भ आपल्याला लागत नाही. पण अग्निपुराणानुसार आपली स्वप्ने आपल्याला शुभ अशुभ संकेत देत असतात. त्यांचा आपल्या आयुष्यावर खोल परिणाम होतो.

कधीकधी आपण काही वाईट स्वप्ने पाहतो, परंतु याचा अर्थ असा नाही की ते भविष्यात कोणतेही वाईट चिन्ह दर्शवत आहे. जेंव्हा तुम्ही एखादे चांगले किंवा वाईट स्वप्न पाहाल तेंव्हा सर्वात आधी त्याच्या फळाचा विचार करा. यानंतर, त्यानुसार तुम्ही काही उपाय देखील करा जेणेकरुन तुम्हाला त्या स्वप्नाचे शुभ परिणाम मिळू शकतील किंवा त्याचे अशुभ परिणाम टाळता येतील.

चला तर मग जाणून घेऊयात चांगल्या-वाईट स्वप्नांवर काय उपाय कराल

चांगले स्वप्न

असे मानले जाते की जर एखाद्याने स्वप्नात स्वतःला फळे खाताना पाहिले तर त्याच्या अंगणात लक्ष्मीचा ढीग नक्कीच लागतो. स्वप्नात स्वतःला खाटेवर झोपलेले पाहणे हे एक चांगले चिन्ह आहे. जो माणूस स्वप्नात विष प्राशन करून मरताना पाहतो, तो रोग आणि क्लेशांपासून मुक्त होतो आणि खूप आनंद घेतो. जो शोक करत आहे किंवा स्वप्नात स्वतःला रडताना किंवा मरताना पाहतो, तर त्याने घाबरू नये, हे स्वप्न शुभ संकेत देते आणि त्याला भविष्यात पूर्ण सुख प्राप्त होते.

चांगल्या स्वप्नांनंतर काय करावे

रात्री झोपताना शुभ स्वप्न पडले तर त्या नंतर पुन्हा झोपू नका. शुभ स्वप्न पाहून झोपी गेल्यास त्याचे शुभ परिणाम व्यर्थ जातात. चांगली स्वप्ने पाहिल्यानंतर सकाळपर्यंत शक्य असल्यास भगवंताची श्लोक म्हणा जेणे करुन स्वप्न खरे होण्यास मदत होईल.

वाईट स्वप्न

जर स्वप्नात बूट चोरीला गेले तर ते रोग वाढवण्याचा संकेत आहे.
मधमाशांनी स्वप्नात घरामध्ये पोळे ठेवले तर भविष्यात काही अशुभ घटना घडण्याचे संकेत मिळतात.
जर स्वप्नात कुत्रा चावला आणि मांस बाहेर काढले तर शत्रूकडून नुकसान होते.
स्वप्नात झाडू पाहणे खूप अशुभ आहे.
वाईट स्वप्न पडल्यावर करा हे उपाय

वाईट स्वप्न पाहील्यानंतर करायचे उपाय

रात्री वाईट स्वप्न पडल्यास त्याचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी स्नान व ध्यान करून महामृत्युंजय मंत्राचा जप करावा, विष्णु सहस्रनाम किंवा भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा.किमान एक जपमाळ जप करावा. हे उपाय केल्याने अशुभ स्वप्नांचे दुष्परिणाम दूर होतात. त्याच प्रमाणे हे स्वप्न कोणालाही सांगू नका. तर वाईट स्वप्न पाहील्यावर लवकर झोपून जा त्यामुळे स्वप्नाचा परिणाम कमी होईल.

इतर बातम्या : 

Drawing Room Vastu | ड्रॉईंग रूममधील वस्तू योग्य दिशेला ठेवा, अन्यथा आर्थिक नुकसान भोगावं लागेल

Chanakya Niti | गर्दीतही एकटे वाटतयं ? स्वत: चा शोध घेण्यासाठी आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 6 गोष्टी मरेपर्यंत लक्षात ठेवा

Vastu shastra | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही आहे? मग हे वास्तु बदल करुनच पाहा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI