Baba Vanga predicts : अखेर बाबा वेंगांचं ते भाकीत खरं ठरलं, नव्या सायलंट किलरची एन्ट्री, संपूर्ण जग धोक्यात

जेव्हा जेव्हा जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्यांची चर्चा होते, त्यामध्ये सर्वात आघाडीवर बाबा वेंगा यांचं नाव असतं. बाबा वेंगा यांचा जन्म बाल्कनमध्ये 1911 साली झाला.

Baba Vanga predicts : अखेर बाबा वेंगांचं ते भाकीत खरं ठरलं, नव्या सायलंट किलरची एन्ट्री, संपूर्ण जग धोक्यात
Image Credit source: Instagram
| Updated on: May 14, 2025 | 3:43 PM

जेव्हा जेव्हा जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्यांची चर्चा होते, त्यामध्ये सर्वात आघाडीवर बाबा वेंगा यांचं नाव असतं. बाबा वेंगा यांचा जन्म बाल्कनमध्ये 1911 साली झाला, तर त्यांचा मृत्यू 1996 साली झाला. बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक भाकीतं केली, त्यातील काही भाकीतं ही खरी ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतो. त्यामध्ये जपानमध्ये आलेली त्सुनामी, अमेरिकेवर झालेला हल्ला, हिटलरचा मृत्यू, इंग्लंडच्या महाराणीचा मृत्यू अशा काही भविष्यवाणींचा समावेश आहे. बाबा वेंगा यांच्या संदर्भात असा दावा केला जातो की, एका वादळामध्ये सापडल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली, त्यानंतर त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली.

बाबा वेंगा यांनी अनेक दशकांपूर्वीच स्मर्ट फोन तुमच्या- आमच्या हातात असलेल्या मोबाईलबद्दल मोठी भविष्यवाणी केली होती, एक इशारा दिला होता, आज बाबा वेंगा यांचा हा इशारा खरा होताना दिसत आहे. आज आपल्याला लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत सर्वांच्या हातात मोबाईल दिसतो. या मोबाईलमुळे अनेक गुंतागुतीच्या सामाजिक आणि मानसिक समस्या देखील उद्भवल्या आहेत. या संदर्भात बाबा वेंगा यांनी खूप आधीच मोठं भाकीत वर्तवलं होतं.

एक काळ असा येईल की, तेव्हा लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत सर्वचजण एका छोट्या इलेक्ट्रॉनिक उपकरणावर खूप जास्त अवलंबून राहातील, असं बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं. यामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागेल, अनेक नवे आजार निर्माण होतील, हे इलेक्ट्रॉनिक उपकरण सायलंट किलर ठरेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं. हे इलेक्ट्रॉनिक उपकरण दुसरं तिसरं काही नसून मोबाईलच आहे, असा दावा आता करण्यात येत आहे.

दरम्यान बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक भाकीतं वर्तवली आहेत. बाबा वेंगा यांनी 2025 संदर्भात देखील मोठं भाकीत वर्तवलेलं आहे. 2025 हे वर्ष जगाच्या अंताची सुरुवात असेल, या वर्षात अनेक मोठ्या भूकंपांचा जगाला सामान करावा लागेल, युद्ध होतील, याचा मोठा फटका हा जगाला बसेल, काही देशांमध्ये महापूर येतील असं भाकीत बाबा वेंगा यांनी वर्तवलं आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)