AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gemini/Cancer Rashifal Today 23 September 2021 | कुटुंबात कोणत्याही बाहेरील व्यक्तीला हस्तक्षेप करु देऊ नका, कुटुंबात सुख आणि शांती राहील

गुरुवार 23 सप्टेंबर 2021आहे (Gemini/Cancer Rashifal). गुरुवारचा दिवस हा जगाचे पालनहार भगवान नारायण यांना समर्पित असतो. गुरुवारी भगवान विष्णूंची विधीवत पूजा केल्याने ते प्रसन्न होतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल.

Gemini/Cancer Rashifal Today 23 September 2021 | कुटुंबात कोणत्याही बाहेरील व्यक्तीला हस्तक्षेप करु देऊ नका, कुटुंबात सुख आणि शांती राहील
mithun-karka
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Sep 23, 2021 | 8:01 AM
Share

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : गुरुवार 23 सप्टेंबर 2021आहे (Gemini/Cancer Rashifal). गुरुवारचा दिवस हा जगाचे पालनहार भगवान नारायण यांना समर्पित असतो. गुरुवारी भगवान विष्णूंची विधीवत पूजा केल्याने ते प्रसन्न होतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. नारायणाची कुणावर कृपा असेल. मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या गुरुवारचं संपूर्ण राशीभविष्य (Gemini/Cancer Daily Horoscope Of 23 September 2021 Mithun And Karka Rashifal Today) –

मिथुन राश‍ी (Gemini)

आपले सकारात्मक व्यक्तिमत्व आणि वागणूक आपल्याला योग्य सुसंवाद राखण्यास आणि जुने मतभेद आणि गैरसमज वेळेत सोडविण्यास मदत करेल. मुलांना अभ्यासात अपेक्षित परिणाम मिळेल. घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वादही घरात राहतील.

मुलांच्या दिनचर्येबाबत काही चिंता असेल. पण, हा फक्त तुमचा भ्रम असेल. उत्पन्नाबरोबरच खर्चाचाही अतिरेक होईल. संयम बाळगण्याची ही वेळ आहे. नको असलेल्या लोकांपासून अंतर ठेवा.

कामात तुमची कार्यक्षमता थोडी कमी होईल. लक्षात ठेवा की स्वतःला सिद्ध करण्यासाठी संघर्ष आणि कठोर परिश्रम आवश्यक आहेत. एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याशी किंवा राजकारण्याशी भेट तुमच्या नशिबाची दारे उघडू शकते.

लव्ह फोकस – जीवन साथीदाराच्या आरोग्यामध्ये काही चढ-उतार येतील. घरात काही पाहुण्यांच्या आगमनाच्या माहितीमुळे उत्सवाचे वातावरण असेल.

खबरदारी – हृदयरोग आणि मधुमेहासारख्या समस्यांबाबत निष्काळजी राहू नका. नियमित तपासणी आवश्यक आहे.

लकी रंग – हिरवा लकी अक्षर- र फ्रेंडली नंबर- 3

कर्क राश‍ी (Cancer)

कुटुंबात शांतता आणि सौहार्द राहील. घराच्या देखभालीसाठी आणि सजावटीसाठी कुटुंबातील सदस्यांसह खरेदीमध्ये वेळ घालवला जाईल. व्यावसायिक अभ्यासासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. म्हणून एकाग्र मनाने आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.

अपरिचित लोकांशी संपर्क विकसित करु नका. तसेच, तुमच्या कुटुंबात कोणत्याही बाहेरील व्यक्तीला हस्तक्षेप करु देऊ नका. वाहन चालवताना मोबाईल फोन वगैरे वापरु नका. काही प्रकारचे अपघात घडण्याची शक्यता आहे.

व्यवसायात काही कठीण आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज आहे. यंत्रसामग्री आणि कर्मचारी इत्यादींशी संबंधित किरकोळ समस्या समोर येतील. पण, तुम्ही त्यांना सर्व गांभीर्याने सोडवाल. नोकरदार व्यक्ती आपल्या सहकाऱ्यासह आपले ध्येय साध्य करण्यास सक्षम असेल.

लव्ह फोकस – कुटुंबात सुख आणि शांती राहील. प्रेम प्रकरण घडेल, परंतु हे लक्षात ठेवा की भावनात्मकतेमुळे तुम्ही तुमच्या अभ्यासावर आणि करिअरवर कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ देऊ नका.

खबरदारी – जास्त मेहनतीमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच विश्रांती घेणे खूप महत्वाचे आहे.

लकी रंग – आकाशी लकी अक्षर- म फ्रेंडली नंबर- 9

Gemini/Cancer Daily Horoscope Of 23 September 2021 Mithun And Karka Rashifal Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्तींना आनंदी राहणे वाटते सोपे, नेहमी राहतात सकारात्मक

Zodiac Signs | या 4 राशींच्या व्यक्ती नेहमी त्यांच्या लूक्सबाबत असतात जागरुक

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…