AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gemini/Cancer Rashifal Today 4 August 2021 | तुमचे विचार कृतीत रुपांतरित होतील, नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल

मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे.

Gemini/Cancer Rashifal Today 4 August 2021 | तुमचे विचार कृतीत रुपांतरित होतील, नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल
Gemini_Cancer
| Edited By: | Updated on: Aug 04, 2021 | 12:10 AM
Share

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : बुधवार 4 ऑगस्ट 2021 (Gemini/Cancer Rashifal). बुधवारचा दिवस हा श्री गणेशाला समर्पित असतो. बुधवारी विघ्नहर्त्याची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपली सर्व विघ्न दूर करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या बुधवारचं संपूर्ण राशीभविष्य (Gemini/Cancer Daily Horoscope Of 4 August 2021 Mithun And Karka Rashifal Today) –

मिथुन राश‍ी (Gemini), 4 ऑगस्ट

आज तुमचे विचार कृतीत रुपांतरित होतील. ज्यामुळे तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल. तुमची स्वप्ने आणि कल्पना सत्यात उतरवण्याची ही योग्य वेळ आहे. समाजातही आदर राहील.

विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. निरुपयोगी कामांमध्ये वेळ वाया घालवू नका. घरात अप्रिय व्यक्ती आल्यामुळे मन अस्वस्थ राहील. तुमच्यावर ताण येऊ देऊ नका आणि सकारात्मक रहा.

कामाच्या ठिकाणी कोणाशीही कोणताही व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. यावेळी व्यवसायात खूप व्यस्तता राहील. नोकरदार लोकांना त्यांच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम मिळतील.

लव्ह फोकस – पती-पत्नीमध्ये सुरु असलेले गैरसमज दूर होतील आणि नात्यामध्ये पुन्हा गोडवा येईल.

खबरदारी – आरोग्य चांगले राहील. परंतु सध्याच्या नकारात्मक वातावरणापासून स्वत:ला सुरक्षित ठेवणे खूप महत्वाचे आहे.

लकी रंग – लाल लकी अक्षर- अ फ्रेंडली नंबर- 6

कर्क राश‍ी ( Cancer), 4 ऑगस्ट

कोणतेही सरकारी काम रखडले असेल तर ते पूर्ण करण्याची योग्य वेळ आहे. आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. जरी खूप धावपळ आणि सूर्यप्रकाश असेल, परंतु कामातील यश तुमचा थकवा दूर करेल. अनुभवी लोकही उपलब्ध होतील.

जुने वाद पुन्हा उफाळून येऊ शकतात. कधीकधी तुमची शंका घेण्याची प्रवृत्ती तुम्हाला त्रास देईल. आपला विचार सकारात्मक ठेवा. विशेषतः आपल्या पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका.

मालमत्तेशी संबंधित व्यवसायात चांगला सौदा होण्याची शक्यता आहे. व्यवसायाला पुढे नेण्यासाठी काही महत्त्वाच्या योजनाही बनवल्या जातील, ज्या यशस्वीही होतील. पण, कोणतेही नवीन काम सुरु करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लव्ह फोकस – पती-पत्नीच्या नात्यात गोडवा राहील. पण प्रेम प्रकरणांबद्दल प्रामाणिक असणे महत्त्वाचे आहे.

खबरदारी – जास्त कामामुळे थकवा आणि अशक्तपणा राहील. वेळोवेळी विश्रांती घ्या

लकी रंग – निळा लकी अक्षर- प फ्रेंडली नंबर- 1

Gemini/Cancer Daily Horoscope Of 4 August 2021 Mithun And Karka Rashifal Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या 5 राशीच्या व्यक्ती भावनिकरित्या असतात सर्वात मजबूत, जाणून घ्या तुमच्या राशीबाबात

Zodiac Signs | या दोन राशींचा विवाह म्हणजे रोज घरात वादाला आमंत्रण, शुभमंगल करताना व्हा सावधान

Follow Us
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?