AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hanuman Jayanti 2023 : या चार राशींवर हनुमानाची राहते विशेष कृपा, मिळते प्रत्त्येक कामात यश

मंगळवार आणि शनिवार हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी विशेष फलदायी आहेत. या दिवशी हनुमान चालीसा, बजरंग बाण आणि सुंदरकांड पाठ करणाऱ्यावर हनुमान विशेष आशीर्वाद देतात.

Hanuman Jayanti 2023 : या चार राशींवर हनुमानाची राहते विशेष कृपा, मिळते प्रत्त्येक कामात यश
हनुमानImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 06, 2023 | 10:39 AM
Share

मुंबई :  हनुमान सहज प्रसन्न होणारे दैवत असून आजही कलियुगात ते सशरीर अस्तितवात आहे. हनुमानाला भगवान शंकराचे रुद्रावतार मानले जाते. जो भक्त हनुमानाची खऱ्या मनाने पूजा करतो, त्याच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. मंगळवार आणि शनिवार हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी विशेष फलदायी आहेत. या दिवशी हनुमान चालीसा, बजरंग बाण आणि सुंदरकांड पाठ करणाऱ्यावर हनुमान विशेष आशीर्वाद देतात. हिंदू कॅलेंडरनुसार, हनुमानजींची जयंती (Hanuman Jayanti 2023) चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या तिथीचे व्रत ठेऊन हनुमानजीची विशेष पूजा केली जाते. जो भक्त नियमितपणे हनुमंताची पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून त्वरित मुक्ती मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार हनुमानजींची पूजा केल्याने कुंडलीत उपस्थित असलेल्या सर्व प्रकारच्या ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते. ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीच्या लोकांवर हनुमानजींची विशेष कृपा कायम असते. चला जाणून घेऊया हनुमानाची कोणत्या राशींवर विशेष कृपा असते.

मेष

राशीतील पहिले चिन्ह मेष आहे आणि या राशीचा स्वामी मंगळ आहे. मेष राशीच्या लोकांवर हनुमानजींची विशेष कृपा असते. या राशीच्या लोकांनी मंगळवार आणि शनिवारी हनुमानजींची पूजा करून चालीसा पाठ केल्यास त्यांच्या जीवनात सदैव सुख-समृद्धी राहते. या राशीवर हनुमानजींच्या कृपेमुळे संकटांपासून लवकर मुक्ती मिळते आणि प्रत्येक कामात चांगले यश प्राप्त होते.

सिंह

या राशीच्या लोकांवर हनुमंताची कृपा सदैव राहते. सिंह राशीचा स्वामी सूर्य ग्रह आहे आणि सूर्य हा हनुमानजींचा गुरु आहे, अशा स्थितीत हनुमान सिंह राशीच्या लोकांवर विशेष कृपा ठेवतात. या राशीच्या लोकांनी हनुमानजीची पूजा अवश्य करावी. हनुमानाची पूजा केल्याने या राशीच्या लोकांना समाजात चांगला मान-सन्मान आणि प्रसिद्धी मिळते. अशा लोकांवर हनुमानाची कृपा असल्याने ते कोणतेही कठीण काम करण्यास मागे हटत नाहीत.

वृश्चिक

या राशीचा शासक ग्रह मंगळ मानला जातो. वृश्चिक राशीच्या लोकांना हनुमानजींचा विशेष आशीर्वाद मिळतो, त्यामुळे त्यांना चांगली नोकरी, प्रतिष्ठा आणि व्यवसायात चांगला नफा मिळतो. त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सुख, समृद्धी आणि प्रसिद्धी मिळते. जीवनात चैनीची आणि सुखसोयींची कमतरता नसते.

कुंभ

कुंभ देखील हनुमानजींच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. जो भक्त नियमितपणे हनुमानजीची पूजा करतो त्याला हनुमानासह शनिदेवाची कृपा प्राप्त होते. अशा लोकांचे जीवन सुख-समृद्धीने भरलेले असते. सामाजीक प्रतीष्ठा वाढते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.