AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope : 30 वर्षानंतर तीन राशींच्या गोचर कुंडलीत तयार झाला केंद्र त्रिकोण राजयोग, असा होणार फायदा

Kendra Trikon Rajyog : ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती बदलली की अंदाजही बदलतात. त्यामुळे ग्रहांचं गोचर खूप महत्त्वाचं ठरतं. सध्या केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला असून तीन राशींचं नशिब चमकणार आहे.

Horoscope : 30 वर्षानंतर तीन राशींच्या गोचर कुंडलीत तयार झाला केंद्र त्रिकोण राजयोग, असा होणार फायदा
Horoscope : 30 वर्षानंतर राशीचक्रात घडतंय असं काही, केंद्र त्रिकोण राजयोगामुळे तीन राशींचं नशिब फळफळणार
| Updated on: Sep 04, 2023 | 4:17 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवर बरंच काही अवलंबूत असतं. ग्रहांच्या गोचरासोबत त्यांची स्थिती आणि दृष्टी खूप महत्त्वाची ठरते. शनिदेव सध्या स्वरास असलेल्या कुंभ राशीत आहे. त्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण केला आहे. त्याता शनिदेव वक्री स्थितीत भ्रमण करत आहेत.कुंडलीत 1,4,7,10 हे स्थान केंद्र स्थान संबोधलं जातं. या स्थानांमधये भगवान विष्णुंचं स्थान असल्याचं सांगितलं जातं. चारही केंद्रासाठी पाचवं आणि नववं स्थान त्रिकोण स्थान तयार करते. याला लक्ष्मी स्थान मानलं जातं. कुंडलीत जेव्हा त्रिकोणचा स्वामी ग्रह केंद्रात उच्च स्थानी बसला असेल किंवा केंद्र स्वामी ग्रह त्रिकोणमध्ये उच्च स्थानी असेल तेव्हा केंद्र त्रिकोण राजयोग तयार होतो. अशात या स्थानात ग्रहांचा गोचर होते तेव्हा कुंडलीत केंद्र त्रिकोण राजयोग तयार होतो. केंद्र त्रिकोण राजयोगामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ होणार आहे. अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.

तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ

सिंह : केंद्र त्रिकोण राजयोगामुळे या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेली आर्थिक अडचण दूर होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना नवी जबाबदारी मिळेल. तसेच पद वाढल्याने आपल्या हातून काही चांगली कामं होतील. त्यामुळे कंपनी आणि वैयक्तिक स्तरावर तुम्हाला फायदा होईल. पत्नीकडून उत्तम साथ मिळेल.

कुंभ : केंद्र त्रिकोण राजयोगामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. कारण हा योग या राशीच्या लग्न स्थानात तयार होत आहे. आत्मविश्वास आणि बुद्धीच्या जोरावर काही निर्णय घ्याल. हे निर्णय पथ्यावर पडतील. काही इच्छा या काळात पूर्ण होतील. व्यवसायिकांना या काळात लाभ होऊ शकतो. वाद होईल असं वागू नका. वाणीवर नियंत्रण ठेवा.

तूळ : केंद्र त्रिकोण राजयोग या राशीच्या पंचम स्थानात तयार होत आहे. यामुळे मुलांकडून चांगल्या बातम्या कानावर पडतील. त्यांची प्रगती पाहून ऊर भरून येईल. या कालावधीत तुम्ही काही किचकट निर्णय घेऊ शकता.स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. तसेच अचानकपणे धनलाभ होऊ शकतो. जागेशी निगडीत व्यवहार या कालावधीत पूर्ण होऊ शकतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.