AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजचे राशीभविष्य 12 June 2025 : कोणत्या राशीला होणार धनलाभ, कोणाला मिळणार सरप्राईज?

Horoscope Today 12 June 2025 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य.

आजचे राशीभविष्य 12 June 2025 : कोणत्या राशीला होणार धनलाभ, कोणाला मिळणार सरप्राईज?
Horoscope
| Updated on: Jun 12, 2025 | 7:30 AM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 12 June 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच चांगला राहील. बऱ्याच काळापासून मनात असलेली एखादी इच्छा आज पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. तुम्ही व्यवसायाच्या कामासाठी प्रवासाला जाऊ शकता. वैवाहिक आयुष्यात प्रेम वाढेल. तुमचा जोडीदार तुम्हाला कोणतीतरी प्रॉपर्टी खरेदी करण्यास सांगू शकतो.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खर्चाचा असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत शॉपिंगला जायला लागू शकते. ज्यामुळे तुमच्या खिशावर परिणाम होईल. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत आजचा दिवस थोडा कमजोर असू शकतो. कोणत्याही गोष्टीबद्दल अति-आत्मविश्वास ठेवू नका. कामाच्या बाबतीत आजचा दिवस चांगला ठरेल. विवाहित लोकांच्या जीवनात आज थोडा तणाव वाढू शकतो.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी कमी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. तुमची कमाई चांगली राहील. व्यवसायातही चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. तुम्हाला आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची चांगली संधी मिळेल. तुम्ही डिनर डेटवर जाण्याचा प्लॅनही करु शकता. विवाहित लोकांना आज एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी सामान्य राहील. व्यावसायिक लोकांसाठी आजचा दिवस खूप अनुकूल असेल. आज तुम्ही कामात खूप व्यस्त राहू शकता. आर्थिकदृष्ट्या तुम्ही खूप मजबूत दिसाल. कुटुंबातील लोकांसाठीही आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. आज तुम्हाला आईबद्दल विशेष प्रेम वाटेल. आज कुटुंबात जमीन-जुमल्याशी संबंधित चर्चा होऊ शकते, तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमच्या करिअरसाठी हा एक चांगला दिवस आहे. खाजगी जीवनही समाधानकारक राहील.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी परदेशातून चांगली बातमी घेऊन येऊ शकतो. कामाच्या निमित्ताने तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागू शकते. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला खोकला, सर्दीसारख्या संसर्गजन्य आजारांमुळे त्रास होऊ शकतो. आज आरोग्याबाबत निष्काळजीपणा करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. विरोधकांपासून सावध रहा.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

कन्या राशीच्या लोकांनी आज कोणत्याही गोष्टीचा ताण स्वतःवर येऊ देऊ नका. मानसिकदृष्ट्या स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. तणावामुळे तुमची आर्थिक स्थिती आणि तुमचा व्यवसायही प्रभावित होऊ शकतो. आज कामाच्या बाबतीत स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा, जेणेकरून तुम्ही चांगले काम करू शकाल. आज तुम्हाला तुमच्या माहेरच्या घरी जाण्याची संधीही मिळू शकते.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी आनंदाने भरलेला असेल. आज तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. व्यवसायात चांगल्या लाभाची शक्यता आहे. खाजगी जीवन आनंदाने भरलेले असेल. आज तुमचा बॉस तुम्हाला कामाबद्दल काही सल्ला देऊ शकतो. जो तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. जर तुम्हाला कोणतेही काम करायचे असेल, तर तुम्ही त्यांना साथ देणे चांगले असेल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्र फळ देणारा असेल. कोणाकडूनही कर्ज घेऊ नका. तुमच्या खर्चातही लक्षणीय वाढ होईल. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दिवस थोडा निराशाजनक राहू शकतो. परंतु, मानसिकदृष्ट्या तुम्ही खूप मजबूत राहाल. एकाच वेळी अनेक कामे पूर्ण कराल. नोकरीसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. दांपत्य जीवनात काही अडचणी येऊ शकतात. पण आज तुम्ही प्रत्येक आव्हानाचा सामना आत्मविश्वास आणि योग्य प्रकारे करू शकाल.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

धनू राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. आज तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट मोकळेपणाने बोलू शकता. तो देखील तुमच्या प्रेमात बुडालेला दिसेल. जर तुम्ही विवाहित असाल, तर काहीतरी सरप्राईज प्लॅन करू शकतात. आज दिवस कमाईच्या बाबतीत खूप चांगला असेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही मजबूत स्थितीत राहाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आज आपली नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

मकर राशीच्या लोकांना आज प्रॉपर्टीशी संबंधित कोणतीतरी मोठी माहिती मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. जर तुम्ही स्वतःचे घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्याही आज तुमचा दिवस मजबूत राहील. कार्यक्षेत्रात तुम्ही स्वतःसाठी बोलू शकाल, म्हणजेच आजचा दिवस अनेक बाबतीत तुमच्यासाठी चांगला राहील. कुटुंबातही चांगले संबंध राहतील. आईचे प्रेम तुम्हाला मिळेल.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास खूप जास्त राहील. ज्यामुळे तुम्ही व्यवसायात मोठा धोका पत्करण्यास तयार व्हाल. पण कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा, नुकसान होऊ शकते. आरोग्यात सुधारणा होईल, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद वाटेल. दांपत्य जीवनात आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो. तुमच्या आणि तुमच्या जोडीदारात अहंकाराचा संघर्ष होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने अधिक चांगले प्रदर्शन करू शकतील.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी ग्रहांची स्थिती आज तुमच्या बाजूने राहील, ज्यामुळे आर्थिक लाभाची मोठी शक्यता आहे. आज तुम्ही एखादी मोठी पॉलिसी खरेदी करू शकता. एखाद्या योजनेत गुंतवणूक करू शकता. कुटुंबाचे वातावरण खूप चांगले राहील. कुटुंबात मालमत्ता किंवा वाहन खरेदीबद्दल चर्चा होऊ शकते. धनलाभ होईल. आज तुम्ही चांगल्या जेवणाचा आनंद घ्याल. आजचा दिवस व्यवसायातही अनुकूलता घेऊन येईल. आज तुम्ही मजबूत राहाल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.