AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today 26 November 2023 : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात

आजचे राशी भविष्य, जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. आज कोणतंही काम टाळू नका. नोकरी किंवा व्यापारात जे लक्ष्य निर्धारित केलं आहे त्यावर लक्ष केंद्रीत करा. एकाग्रतेने काम करण्याचा प्रयत्न करा. नव्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. कुटुंबातील काही सदस्यांसोबत चांगला वेळ व्यतीत कराल. मन आणि बुद्धीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

Horoscope Today 26 November 2023 : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात
राशी भविष्य
| Updated on: Nov 26, 2023 | 7:20 AM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 26 November 2023) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

बारा राशींचे आजचे राशी भविष्य

  1. मेष – एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही भेट घडेल. विचारपूर्वक काम करा. कामाप्रती असणारी एकाग्रता खंडित होऊन देऊ नका. नोकरीच्या ठिकाणी एखादं नवं काम तुम्हाला दिलं जाऊ शकतं. स्वत:ला तयार ठेवा. प्रवासयोग आहे, जुने वाद मिटतील.
  2. वृषभ- जास्तीत जास्त कामं पूर्णत्वास जाऊन त्याचा तुम्हाला फायदाच होईल. मित्रांसोबत काही बेत आखाल. व्यापारात चांगल्या संधी मिळतील. काही प्रकरणांमध्ये अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरुर घ्या. आज एखादी खास गोष्ट कानांवर येईल. आरोग्याकडे लक्ष द्या.
  3. मिथुन- कोणा एका खास मित्राची मदत मिळेल. महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. याचा पुरेपूर फायदा घ्या. दैनंदिन जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल कराल. मित्रांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. साथीदाराला पूर्ण वेळ द्या.
  4.   कर्क- दिवस चांगला आहे. जास्तीत जास्त कामं पूर्णत्वास न्याल. आर्थिक परिस्थिती लक्षात घ्या. अडचणीच्या प्रसंगात इतरांची मदत घ्या. कोणतंही काम विचारपूर्वकपणेच करा. काही कारणास्तव जुन्या आठवणींमध्ये रमाल.
  5. सिंह – बुद्धिचातुर्याने सारंकाही सांभाळून नेण्याची चिन्हं आहेत. नोकरीसापेक्षा लोकांना सहकाराऱ्यांची साथ मिळेल. पुढे जाण्याची चिन्हं आहेत. इतरांच्या काही अडचणींवर तोडगा काढून देण्यासाठी तुमची मदत होणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
  6. कन्या – ज्या व्यक्तींसोबत संवाद साधाल त्यांच्यासोबत तुमचं एकमत असेल. कुटुंबासमोर तुमचे निर्णय अधिक स्पष्टपणे मांडाल. लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. व्यापारात काही महत्त्वाचे बदल घडवून आणण्याचीही इच्छा होईल. आरोग्याची काळजी घ्या.
  7. तुळ- व्यस्त असाल. शांततेने काम करा. इतरांचं म्हणणं तितक्याच गांभीर्याने ऐका. इतर व्यक्ती तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील. कागदोपत्री व्यवहारावर लक्ष ठेवा. जबाबदारी वाढेल. नोकरीच्या ठिकाणी मोठं यश तुमच्या वाट्याला येईल .
  8. वृश्चिक- कोणा एका गुंतागुंतीच्या प्रकरणावर तोडगा काढाल. ज्यामध्ये बऱ्याच अंशी यशस्वीसुद्धा ठराल. जुन्या गोष्टीविसरुन पुढे जा. एखादा असा प्रसंग समोर येईल जो पाहता तुमची विचारसरणीच बदलेल. नोकरीच्या ठिकाणी मोठं यश तुमच्या वाट्याला येईल.
  9.  धनू- जुन्या कामांचा फायद होईल. जुन्या मित्रांची अचानक मदत होईल. धार्मिक यात्रेवर जाण्याचा योग आहे. दिवस शांततेत व्यतीत होईल. आज तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागेल. प्रयत्न करत राहा, साथीदाराचं सहकार्य मिळेल.
  10. मकर- नोकरी, व्यापाराता नवे प्रस्ताव मिळतील. विचाराधीन कामं पूर्णत्वास जातील. नव्या कामांची सुरुवात कराल. हळूहळू तुम्हाला यश मिळेल. रेंगाळलेली कामंही मार्गी लागतील. कामावर लक्ष द्या.  कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेतना विचार नक्की करा.
  11. कुंभ- आज कोणतंही काम टाळू नका. नोकरी किंवा व्यापारात जे लक्ष्य निर्धारित केलं आहे त्यावर लक्ष केंद्रीत करा. एकाग्रतेने काम करण्याचा प्रयत्न करा. नव्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. कुटुंबातील काही सदस्यांसोबत चांगला वेळ व्यतीत कराल. मन आणि बुद्धीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
  12. मीन-  नवी संधी मिळेल. तुमच्या योजनांना समर्थन मिळेल. व्यापारात पूर्णपणे यशस्वी व्हाल. नव्या व्यक्तींशी भेट घडेल. नशिबाची साथ असेल. सकारात्मक राहा. आरोग्याची काळजी घ्या. दिवस चांगला आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.