AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजचे राशीभविष्य 28 October 2025 : कुटुंबातील वाद मिटणार, मित्रामुळे फायदा… कोणत्या राशीत काय योग?

Horoscope Today 28 October 2025 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 28 October 2025 : कुटुंबातील वाद मिटणार, मित्रामुळे फायदा... कोणत्या राशीत काय योग?
| Updated on: Oct 28, 2025 | 8:38 AM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 28 October 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस भाग्याचा आणि धाडसाचा आहे. आज तुमच्यात वेगळाच उत्साह असेल. ज्यामुळे कामामध्ये गती येईल. कामानिमित्त लांबचे प्रवास संभवतात. हे प्रवास फलदायी ठरतील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यकारक घटना घेऊन येणारा आहे. वाहने आणि द्रुतगती प्रवासाची विशेष आवड राहील.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

वृषभ राशीसाठी आज अचानक धनलाभाचे योग जुळून येतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल, पण आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आज तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय तुम्हाला लगेच मिळेलच असे नाही, त्यामुळे धीर धरा आणि आपले काम सातत्याने सुरू ठेवा.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

मिथुन राशीच्या व्यक्तींना आज जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. त्यांच्या पाठिंब्यामुळे नोकरी आणि व्यवसायाच्या कामांमध्ये एक वेगळा उत्साह येईल. कामाच्या बाबतीत आज समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि नवीन कामांना सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस मनाशी निगडित असेल. काही वेळेला मन उदास वाटू शकते. त्यामुळे आज शक्यतो कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणे टाळावे. दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल, कारण ते रखडण्याची शक्यता आहे. मनःशांतीसाठी ध्यान करणे फायदेशीर ठरेल.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मुलामुलींच्या प्रश्नांना मार्गी लावणारा आहे. तुम्हाला यश मिळेल. मुलांशी संबंधित समस्या सुटतील आणि त्यांच्या प्रगतीने आनंद मिळेल. समाजात नवीन लोकांशी ओळख होईल. उपासनेसाठी दिवस उत्तम आहे. आर्थिक लाभ मिळतील.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

कन्या राशीच्या लोकांना आज उत्साह आणि उमेद वाढवणाऱ्या घटनांचा अनुभव येईल. तुमचे व्यक्तिमत्त्व बहरेल आणि लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. कुटुंबीय सुद्धा तुम्हाला केलेल्या गोष्टींविषयी योग्य पात्र समजतील. एकूणच आजचा दिवस आनंदी आणि उत्साहाचा असेल.

तूळ राशी (Libra Daily Horoscope)

तूळ राशीसाठी आज नोकरी आणि व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. कामे व्यवस्थित होतील. घडलेल्या गोष्टींचे योग्य अवलोकन करून पुढील कालावधीचे नियोजन आज योग्य प्रकारे केले जाईल, ज्यामुळे भविष्यातील मार्ग अधिक स्पष्ट होईल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी चांगला आहे. व्यावसायिक क्षेत्रात काही मोठे आर्थिक करार होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुद्धा सुसंवाद साधून पुढे जाण्याचा योग आहे, ज्यामुळे घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

धनु राशीला आज मानसिक स्वास्थ आणि समाधान लाभण्याचा दिवस आहे. तुम्हाला काय केल्याने आनंद मिळतो हे समजून घ्याल आणि त्यानुसार वागाल. सामाजिक कार्यामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. आज तुम्ही आत्म-चिंतन कराल आणि स्वतःला वेळ द्याल.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

मकर राशीच्या व्यक्तींना आज खर्चाचे प्रमाण वाढते राहील. खर्च जपून करावा लागेल. काय चुकले आणि काय बरोबर याचा शोध घेण्यात आज तुमचा वेळ जाईल. यामुळे तुमचा अध्यात्मिक कल वाढेल. तुम्ही जीवनातील गहन सत्यांकडे आकर्षित व्हाल.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आज वेगळ्या आणि चांगल्या गोष्टी घडतील. शनीची कृपा तुमच्यावर राहील. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात तुमचा वेळ आनंदात जाईल. त्यांच्या मदतीने तुम्ही कामातही पुढे जाल. नवीन संकल्पनांवर काम करण्यासाठी दिवस उत्तम आहे.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

मीन राशीच्या व्यक्तींचा आज अध्यात्माकडे विशेष कल राहील. अनपेक्षित स्रोतातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदारासोबत प्रेम आणि समन्वय टिकून राहील. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता लाभेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार