AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजचे राशीभविष्य 8 September 2025 : पितृपक्षाचा पहिला दिवस कसा जाणार? तुमच्या राशीत काय घडणार?

Horoscope Today 8 September 2025 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 8 September 2025 : पितृपक्षाचा पहिला दिवस कसा जाणार? तुमच्या राशीत काय घडणार?
HoroscopeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 08, 2025 | 7:30 AM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 1 September 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळेल. तुमच्या कल्पनांना योग्य दिशा मिळेल. जुना मित्र अचानक भेटेल. ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला आहे, तुम्हाला अपेक्षित लाभ मिळू शकतो.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कामाच्या ताणामुळे थोडा थकवा जाणवू शकतो. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. कोणताही मोठा निर्णय घाईत घेऊ नका. कुटुंबासोबत वेळ घालवल्यास तुम्हाला मानसिक शांतता मिळेल.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांनी आज सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांवर छाप पाडू शकता. प्रवासाचे योग आहेत, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात. नवीन लोकांशी ओळख होईल, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

कर्क राशीच्या लोकांनी आज भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. लहानसहान गोष्टींवरून वाद होऊ शकतो. त्यामुळे शांत राहा. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील.

सिंह राशी (Leo Daily Horoscope) 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. प्रेमाच्या नात्यात गोडवा येईल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. त्यांना त्यांच्या अभ्यासात यश मिळेल.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

कन्या राशीच्या लोकांनी आज आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कामाचा ताण वाढल्यामुळे थोडा थकवा जाणवेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी योग्य दिवस नाही. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. आध्यात्मिक बाबींमध्ये मन रमवल्यास शांती मिळेल.

तूळ राशी (Libra Daily Horoscope)

तूळ राशीच्या व्यक्ती आज कामात यशस्वी व्हाल. तुमचे प्रयत्न तुम्हाला यश मिळवून देतील. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. कुटुंबासोबत आनंदी क्षण घालवाल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांनी आज तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही गोष्टीवर घाईने प्रतिक्रिया देऊ नका. कामाच्या ठिकाणी आज तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक बाबींमध्ये गुंतवणूक करताना काळजी घ्या.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

धनु राशीच्या लोकांना आज तुम्हाला नवीन संधी मिळतील. ज्यामुळे तुमच्या करिअरला नवी दिशा मिळेल. तुम्ही उत्साही आणि सकारात्मक राहाल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

मकर राशीच्या लोकांनी आज कामावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. थोडा जास्त प्रयत्न केल्यास तुम्हाला यश मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. कौटुंबिक वाद टाळण्यासाठी शांत राहण्याचा प्रयत्न करा.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असेल. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल. तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. आर्थिक लाभाचे योग आहेत. तुमच्या मित्रांसोबत वेळ घालवल्यास तुम्हाला आनंद होईल.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

मीन राशीच्या लोकांना आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी थोडे तणावपूर्ण वातावरण असू शकते. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक व्यवहार करताना सावध रहा, कुणावरही लगेच विश्वास ठेवू नका.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.