Numerology : कुठलं करियर तुमच्यासाठी आहे बेस्ट…एका क्लिकवर घ्या जाणून

स्पर्धेच्या जगात आपण कुठलं करियर करायला पाहिजे, असा प्रश्न अनेक मुलामुलींना पडतो. जगण्यासाठी आपल्याला योग्य नोकरी किंवा व्यवसाय करायला पाहिजे. पण आपली निवड चुकी की आयुष्याचे गणित चुकतं. मग अंकशास्त्र तुम्हाला सांगू शकतं तुमच्यासाठी बेस्ट करियर कुठलं असू शकतं ते.

Numerology : कुठलं करियर तुमच्यासाठी आहे बेस्ट...एका क्लिकवर घ्या जाणून
Number
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 6:43 AM

मुंबई: करियर बाबतीचा एक निर्णय चुकला की अनेक गणित चुकत जातात. आपण अनेक जणांकडून ऐकतो हे करियर जमतं नाही आहे किंवा व्यवसायात प्रगती होत नाही. ज्योतिषीशास्त्राप्रमाणे अंकगणित हे एक शास्त्र आहे. अंकशास्त्राचा अभ्यास करणारे तुमच्या जन्मतारखेवरुन तुमचा स्वभाव, तुमच्या आवडीनिवडी आणि तुम्हाला कुठलं करियर योग्य आहे ते सांगतात. तर चला तुमचे अंक काय सांगतात ते जाणून घेऊयात

कुठल्या अंकासाठी कुठलं करियर

जन्मांक किंवा भाग्यांक 1 अंकशास्त्रानुसार भाग्यांक 1 चा स्वामी सूर्य असतो. 1 हा अंक नेतृत्वाशी संबधित आहे. त्यामुळे ज्या व्यवसायात किंवा जॉबमध्ये नेतृत्वगुणाची गरज असते, असे करीअर जन्मांक किंवा भाग्यांक 1 असणाऱ्याना चांगले असते. इलेक्ट्रानिक, दूतावासात नोकरी, संशोधन कार्य, प्रशासकीय सेवा यासारखा नोकरी करणे खूप शुभ आहे. तसंच विजेशी संबंधित व्यवसाय, ईएनटीशी संबंधित वस्तूंचा व्यवसाय, दागिने, सागरी व्यवसाय, सरकारी करार अशाप्रकारेच्या व्यवसायात त्यांना प्रगती मिळू शकते. जन्मतारीख 1, 10, 19, 28

जन्मांक किंवा भाग्यांक 2 – भाग्यांक 2 असलेली व्यक्ती ही खूप क्रिएटिव असतात. या व्यक्तीला गाणे, संगीत, कला आणि लिखाण यात खूप रस असतो. त्यामुळे या भाग्यांकासाठी पत्रकारिता, म्युझिक इंडस्ट्री, साहित्य ही क्षेत्र उत्तम असतात. तर या भाग्यांकासाठी दूधसंबंधित व्यवसाय म्हणजे डेअरी, पशूपालन आणि परिवहन सारख्या कामात त्यांना यश मिळू शकतो. तसंच या भाग्यांकाची लोकं शोधकामात खूप रुची घेतात.

जन्मतारीख 2, 11, 20, 29

जन्मांक किंवा भाग्यांक 3 – या भाग्यांकाची लोकं अतिशय शिस्तप्रिय असतात. शिक्षण, सेवा, कोर्टकचेरीची कामं, पोलीस, बँक, जाहिरात इत्यादी क्षेत्रात ते करियर करु शकतात. तर त्वचा, रक्त, पोटाशी संबंधित औषधे आणि उपकरणे यांच्याशी संबंधित कामात त्यांना विशेष यश मिळतं. तर या भाग्यांकची लोकं चांगली समुपदेशक असतात. जन्मतारीख 3, 12, 21, 30

जन्मांक किंवा भाग्यांक 4 या भाग्यांक असलेली व्यक्ती खूप प्रेमळ आणि खुल्या हाताने खर्च करणारे असतात. भरपूर कमावणे आणि भरपूर खर्च करणे या व्यक्तीचं जीवनाचं ध्येय असतं. या व्यक्ती इंजिनियर, डिझायनर, बिल्डर या क्षेत्रात खूप प्रगती करतील. तसंच तंत्रज्ञान किंवा यंत्रसामग्रीचे कामतही त्यांना यश मिळतं. तसंच वकिल, पत्रकार, आयोगाचे काम, वाहतूक या क्षेत्रात खूप यश मिळतं. 4 जन्मतारीख 4, 13, 22, 31

जन्मांक किंवा भाग्यांक 5

या भाग्यांकाची लोक यशस्वी व्यापारी होऊ शकतात. ते एक चांगले वक्ता असतात. शिक्षक, पत्रकार, व्यवस्थापक, वकील, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, मार्केटिंग या क्षेत्रात आपलं करियर करु शकतात. तर प्रकाशन, जाहिरात हा व्यवसाय यांनी करावा. जन्मतारीख 5, 14, 23

जन्मांक किंवा भाग्यांक 6

या व्यक्ती खूप आकर्षक असतात. या व्यक्ती कायम आनंदी असतात. यांची एक खासियत असते ते लोकांना सहज आपलेसे करतात. वास्तूकला, इंजिनियर, दागिने, परदेशाशी संबंधित काम, हॉटेल्स, चित्रपट आणि मीडियाशी संबंध क्षेत्रात त्यांनी करियर करावं. जन्मतारीख 6, 15, 24

जन्मांक किंवा भाग्यांक 7

या व्यक्ती खूप स्थिर असतात. पत्रकार, लेखक, गुप्तहेर, चित्रपट या क्षेत्रात चांगलं करियर करु शकतात. तर दुग्धव्यवसाय, वाहतूक आणि औषध विक्री यात यश मिळेल. या भाग्यांकाची लोकं चांगले सल्लागार आहेत. 7 जन्मतारीख 7, 16, 25

जन्मांक किंवा भाग्यांक 8

या भाग्यांकांसाठी बँकिंग, व्यवस्थापन, यंत्रसामग्रीशी संबंधित कामात यश मिळेल. कंत्राटी, वकिली, बागकाम, कोळसा, खाणी, कुक्कुटपालन या व्यवसायातही त्यांना प्रगती मिळेल. जन्मतारीख 8, 17, 26

जन्मांक किंवा भाग्यांक 9

सैन्य, पोलीस, अग्निशमन सेवा, वकिली आणि धार्मिक कार्याशी संबंधित क्षेत्रात चांगलं यश मिळेल. या भाग्यांकाची लोकं चांगली खेळाडू होतात. जन्मतारीख 9, 18, 27

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे

इतर बातम्या:

Lord Shiva Puja | आयुष्यात यश मिळवायचे असेल तर सोमवारी हे उपाय नक्की करुन पाहा

Astro Tips | “कुठं ठेवू अनं कुठं नको, अशी अवस्था होईल” एवढा पैसा येईल, त्यासाठी आठवड्याच्या सात दिवसात करायचे हे वेगवेगळे उपाय नक्की वाचा

Sankashti Chaturthi 2021 | कधी असणार वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तिथी आणि पूजा मुहूर्त

How to tell arithmetic which career is best for you

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.