AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope 12 May 2022: निष्काळजीपणा करणं योग्य नाही, नशीब तुमच्या पाठीशी आहे

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ? आजचे तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.

Horoscope 12 May 2022: निष्काळजीपणा करणं योग्य नाही, नशीब तुमच्या पाठीशी आहे
| Edited By: | Updated on: May 12, 2022 | 5:05 AM
Share

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानां (Challenge)चा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.

कर्क –

विद्यार्थ्यांना प्रतिस्पर्ध्यां विरोधात कामात सफलता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या कामात पूर्ण उत्साहाने काम करा. दुपारनंतर अप्रत्यक्षपणे लाभदायक स्थिती होतेय. अनावश्यक खर्च होऊ शकतो पण, त्याचबरोबर धनसंपत्तीचा लाभ होण्याची शक्यता. त्यामुळे जास्त त्रास करून घेण्याची गरज नाही. पण, तुम्ही तुमच्या रागीट स्वभावामुळे काही संबंध खराब करू शकता. तुमचा स्वभाव सकारात्मक ठेवा. तुमचा जनसंपर्क तुमच्यासाठी व्यवसाया संबंधीत नवे स्त्रोत उत्पन्न करू शकतो. त्यामुळे लोकांच्या संपर्कात राहा. इंपोर्ट- एक्सपोर्ट व्यवसायात मंदी राहील. ऑफिस मध्ये कोणाबरोबर वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा.

लव फोकस – प्रेम प्रकरणात जवळीक वाढेल. ज्यामुळे मन प्रफुल्लित राहील. कुंटूबिक जीवनात वातावरण सकारात्मक राहील.

खबरदारी – गॅस आणि एसिडिटीची समस्यां उद्भवेल. हलका आहार घ्या. इम्यून सिस्टमची काळजी घ्या

शुभ रंग – सफेद

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 7

सिंह –

ग्रहमान चांगले राहिल. तुमच्या मेहनती प्रमाणे चांगले परिणाम मिळतील. तुमच्या उत्साहाचा अधिक वापर करा. प्रॉपर्टी संबंधी काम होण्याची शक्यता. तुमच्या गोष्टी संभांळून ठेवा. हरवू शकतात. भावनिक होऊन निर्णय घेवू नका. वर्तनावार अधिक द्या. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. कामाच्या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांसोबत वाद होवू शकतात. मीडिया किंवा फोन द्वारे मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता. त्यामुळे तुमची संपर्क सूत्र अधिक मजबूत करण्यावर भर द्या.

लव फोकस – नवर – बायको आपल्या कामात व्यस्त असल्याने एकमेकांसोबत वेळ घालवू शकत नाहीत. पण, एकमेकांवरचा विश्वास संबंध मजबूत करेल.

खबरदारी – स्वास्थ्य उत्तम राहील. पण, सध्याच्या वातावरणामुळे निष्काळजीपणा करणं योग्य नाही.

शुभ रंग – ऑरेज

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 2

कन्या –

ज्या कामांसाठी तुम्ही काही काळ झटत होता, आज ती कामे पूर्ण करण्याची वेळ आली आहे. तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. नशीब तुमच्या पाठीशी आहे, तुमची एनर्जी कामासाठी पुरेपूर वापरा. परंतु कोणतंही पेमेंट  दिल्याने मन अस्वस्थ राहील. कधीकधी तुमचा संशयास्पद स्वभाव इतरांसाठी त्रासाचे कारण बनतो.  निरुपयोगी कामात वेळ वाया घालवू नका. व्यावसायिक पक्षांशी संबंध दृढ होतील आणि बाहेरील स्त्रोतांकडून मोठी ऑर्डर मिळण्याची तसेच आपल्या योजना गुप्त ठेवण्याची शक्यता आहे. कारण गळती होऊ शकते. सरकारी नोकरदारांनी कोणत्याही प्रकारच्या अनैतिक कामात रस घेऊ नये.

लव फोकस – पती-पत्नी दोघेही व्यस्त वेळापत्रकामुळे एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. पण एकमेकांवर विश्वास ठेवल्याने नातं घट्ट राहिल.

खबरदारी – स्वभावात चिडचिडेपणा आणि थकवा जाणवेल. कामासोबतच तुम्हाला विश्रांतीही घ्यावी लागेल.

शुभ रंग – जांभळा

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 9

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.