Astrology 2025: पापग्रह केतु या तीन राशींना देणार फळ, पूर्वाफाल्गुनी नक्षत्र ठरणार लाभदायी
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि-राहु-केतु हे पापग्रह असून एका राशीत दीर्घकाळ ठाण मांडून बसतात. त्यामुळे त्याचा परिणाम थेट जातकांवर होतो. पण एखाद्या राशीत असताना नक्षत्र बदललं की त्याची फळंही तशीच मिळतात. जुलै महिन्यात असंच काहीसं होणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह राशीबदलासोबत नक्षत्रही बदलतात. ग्रहांचा नक्षत्र गोचराचा कालावधीही ठरलेला आहे. सध्या पापग्रह केतु हा सिंह राशीत दीड वर्षांसाठी विराजमान आहे. असं असताा केतु ग्रह 6 जुलै 2025 रोजी पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. खरं तर सुरुवातीला अभासी प्रशेस असेल मात्र 20 जुलैपासून या नक्षत्रात पूर्णपणे विराजमान होईल. केतु ग्रह 6 जुलै रोजी पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यात राहु आणि केतुची कायम वक्री चाल असते. म्हणजे हे दोन ग्रह कायम उलट्या दिशेने मार्गक्रमण करत असतात. त्यामुळे या ग्रहांचं सुरुवातीला अभासी आणि नंतर वास्तविक गोचर होतं. नक्षत्र गोचरानंतर काही राशींचं नशिब फळफळणार आहे. काही राशींचं नशिब अचानक चमकू शकतं. या तीन राशींना मिळणार केतु ग्रहाचं बळ…
या तीन राशींना मिळणार लाभ
वृषभ : या राशीच्या जातकांना केतु ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरणार आहे. ठरावीक कालावधीनंतर अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. अगदी थोडी मेहनत करूनही चांगला लाभ मिळू शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामावर वरिष्ठ खूश असतील. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढ होऊ शकते. एकंदरीत केतु ग्रहाचं नक्षत्र बदल या राशीच्या जातकांना लाभदायी ठरेल.
तूळ : या राशीच्या जातकांनाही सकारात्मक परिणाम दिसून येतील. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना अपेक्षेप्रमाणे नोकरी मिळू शकते. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली धडपड खऱ्या अर्थाने मार्गी लागू शकते. तसेच अचानक धनलाभाचा योग जुळून येत आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती या कालावधीत सुधारेल. या कालावधीत नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता.
कुंभ : या राशीच्या जातकांना शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. पण केतु ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन काही अंशी लाभदायी ठरेल. घरात आनंदी वातावरण राहील. उत्पन्नात वाढ होईल. तसेच बचत करण्याची मोठी संधी असेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण मिळवाल. तुम्ही ठरवलेल्या सर्व योजना मार्गी लागतील. त्यामुळे डोक्यावरचा ताण हलका होईल. आर्थिक स्थिती सुधारल्याने नातेसंबंधही दृढ होतील. नातेवाईकांकडून कधी नव्हे ती विचारपूस होईल.
