Tension related vastu defects | घरात रोज कलह निर्माण होतोय , रोज भांडण होतात, वस्तुसंबधी हे बदल नक्की करुन बघा

घरात नेहमी वाद होणे, कलहाचे वातावरण निर्माण होणे या समस्या आजकाल नेहमीच येऊ लागल्या आहेत. प्रत्येक घरातील कारणे वेगवेगळी असू शकतात, पण मतभेद किंवा मानसिक तणाव कोणत्याही गरीब किंवा श्रीमंत व्यक्तीवर कधीही होऊ शकतो.

Tension related vastu defects | घरात रोज कलह निर्माण होतोय , रोज भांडण होतात, वस्तुसंबधी हे बदल नक्की करुन बघा
Vastu dosh

मुंबई : घरात नेहमी वाद होणे, कलहाचे वातावरण निर्माण होणे या समस्या आजकाल नेहमीच येऊ लागल्या आहेत. प्रत्येक घरातील कारणे वेगवेगळी असू शकतात, पण मतभेद किंवा मानसिक तणाव कोणत्याही गरीब किंवा श्रीमंत व्यक्तीवर कधीही होऊ शकतो. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या जीवनावर कलह किंवा तणावामुळे परिणाम होत आहे, तर ते दूर करण्यासाठी, तुमच्या घराशी संबंधित त्या वास्तु दोषांवार तुम्ही योग्य तो उपाय केलेत तर यामधून तुम्हाला योग्य तो मार्ग काढता येईल. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते उपाय

  • जर घरातील तुम्हाला मानसिक तणाव टाळायचा असेल तर नेहमी खोलीच्या आग्नेय कोपऱ्यात वीज/उष्णता निर्माण करणारी सौर उपकरणे ठेवावी.
  • वास्तूनुसार घराचा उत्तर-पूर्व कोपरा नेहमी कमी आणि नैऋत्य भाग उंच असावा. कोणत्याही घरामध्ये विरुद्ध नियम पाळल्यास त्या घराचा मालक कर्ज आणि आजारपणामुळे नेहमीच मानसिक तणावाखाली असतो आणि व्यसनांना बळी पडतो.
  • वास्तूनुसार ज्या घरामध्ये ईशान्येला विहीर, बोरिंग, भूमिगत पाण्याची टाकी असेल किंवा या कोनात कोणत्याही प्रकारचा खड्डा असेल तर त्या घराचा प्रमुख जास्त खर्च केल्यामुळे मानसिक तणावाखाली राहतो.
  • वास्तूनुसार घराचा ईशान्य कोन अरुंद असेल तर अशा घरात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्याच प्रमाणे अशा घरात नेहमी भंडणं होत असतात.
  • वास्तूनुसार घराचा आग्नेय कोन लहान किंवा घट्ट असेल तर घरातील मालकिणीला आजार आणि शत्रूंमुळे अनेकदा त्रास होतो. त्याला नेहमी मानसिक उदासीनता असते.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या :

Easy Vastu Tips | हे सोपे उपाय करा, घरातील वास्तू दोष दूर होतील

PHOTO | Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात लावा ‘ही’ 5 झाडे, मिळेल सुख-समृद्धी

शब्द दिला की पाळणारच, अत्यंत निष्ठावान असतात या 4 राशी, जीवनसाथीच्या शोधात असाल तर यांचा नक्की विचार करा


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI