PHOTO | Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात लावा ‘ही’ 5 झाडे, मिळेल सुख-समृद्धी

Vastu Tips : वास्तूमध्ये वेगवेगळ्या झाडांना आणि वनस्पतींना वेगळे महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घरासाठी अशी अनेक झाडे आहेत जी तुमच्या घराची सकारात्मकता वाढवू शकतात.

1/5
बांबू प्लांट- वास्तूनुसार बांबूच्या रोपामुळे तुमच्या घरात सुख, सौभाग्य, शांती आणि संपत्ती येते. ते तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या डेस्कवर ठेवता येते. भेट म्हणून द्यायची ही एक शुभ वनस्पती मानली जाते.

2/5
मनी प्लांट - वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट खोलीच्या आग्नेय कोपऱ्यात घरासमोर ठेवल्याने सुख-समृद्धी येते. असे मानले जाते की ही वनस्पती जितकी जास्त पसरते तितकी संपत्ती वाढते.

3/5
 3. पीस लिली - पीस लिली वनस्पती हे प्रेम आणि सौहार्दाचे प्रतीक आहे. ही वनस्पती बेडरूममध्ये ठेवल्याने तुमची झोपेची पद्धत सुधारू शकते आणि वाईट स्वप्नांपासून तुम्हाला मुक्ती मिळते. तुम्ही तुमच्या खोलीत पीस लिली ठेवू शकता. घरातील हवा शुद्ध करण्यासाठी याचा उपयोग होतो.

4/5
स्नेक प्लांट - वास्तूनुसार स्नेक प्लान्ट सकारात्मक ऊर्जेचा मोठा स्रोत आहे. ही वनस्पती खिडकीजवळ ठेवली जाते. यामुळे खोलीतील वातावरण शांत राहते. असेही म्हटले जाते की, या वनस्पतीमुळे खोलीतील हानिकारक विषारी पदार्थांपासून मुक्तता मिळते.

5/5
तुळस - तुळस ही औषधी गुणांनी परिपूर्ण असण्यासोबतच श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की, ही वनस्पती वास्तु दोष दूर करते. यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI