Leo : सिंह राशीचे लोकं राजकारणात गाठतात मोठी उंची, असा असतो त्यांचा स्वभाव
ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या पत्रिकेत जन्माच्या वेळी सिंह राशीत चंद्र असेल तर त्या व्यक्तीची राशी सिंह मानली जाते. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याला नऊ ग्रहांचा राजा मानले जाते.

मुंबई : प्रत्येक मानसाचा स्वभावगुण असतो. कोणी चिडचीडा कोणी प्रेमळ तर एखादा अधीकार गाजवणारा असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव त्याच्या राशीवर अवलंबून असते. ज्योतिषशास्त्रामध्ये सर्व 12 राशींबद्दल (Astrology) वर्णन आहे. प्रत्येक राशीमध्ये निश्चितपणे काही ना काही खास गुण आणि दोष असतात. राशीनुसार व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कसे असते हे जाणून घेण्याची प्रत्त्येकालाच उत्सुकता असते. आज आपण सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव, गुण आणि दोष यांची माहिती घेऊया. प्रसिद्ध जोतिषी गणेश कुळकर्णी यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
असे असतात सिंह राशीचे लोकं
ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या पत्रिकेत जन्माच्या वेळी सिंह राशीत चंद्र असेल तर त्या व्यक्तीची राशी सिंह मानली जाते. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याला नऊ ग्रहांचा राजा मानले जाते. या कारणास्तव, सिंह राशीचे लोकं राजेशाही आणि दबंग असतात. सिंह राशीच्या लोकांना कोणाच्याही अधिकारात काम करणे आवडत नाही. सिंह राशीचे लोकं शरीराने बळकट असतात आणि त्यांचे कपाळ रुंद असते.
समाजात खूप मानसन्मान मिळवतात
ज्या लोकांची रास सिंह आहे त्यांना समाजात खूप आदर मिळतो. या लोकांमध्ये अप्रतिम नेतृत्व क्षमता आढळते. सिंह राशीचे लोकं सामाजिक मार्गदर्शन करण्यात कुशल असतात. त्यांचे सर्व मित्र सर्वोत्तम आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांची रास सिंह आहे त्यांना आदराची आवड असते. हे लोकं राजकारणात चांगले यश मिळवतात आणि उच्च प्रशासकीय पदे देखील मिळवतात. ते मेहनती आहेत आणि त्यांना न्याय आवडतो. सिंह राशीचे लोकं देखील खूप महत्वाकांक्षी असतात.
राजकारणात गाठतात विशेष उंची
सिंह राशीच्या लोकांना राजकारणात विशेष रस असतो. हे लोकं फार हट्टी स्वभावाचे असतात. गोष्टी जर त्यांच्या मनासारख्या झाल्या नाही तर त्यांना चटकन राग येतो पण त्यांचा राग क्षणिक असतो. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांची राशी सिंह असते त्यांना राजेशाही शैलीत राहणे आवडते. त्यांचे वैवाहिक जीवन फारसे यशस्वी होत नाही. सिंह राशीचे लोक संपत्ती जमा करण्यात फारसे यशस्वी नसतात. या राशीचे लोकं उच्च प्रशासकीय पद, राजकारणी, कारखानदार, न्यायाधीश, डॉक्टर, संस्था प्रमुख, मार्गदर्शक इत्यादी पदांवर यश मिळवतात. या राशीच्या लोकांना राजकारणात विशेष रूची असते. सिंह राशीचे लोकं राजकारणात मोठी उंची गाठतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
