AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Libra/Scorpio Rashifal Today 16 July 2021 | आनंदाची बातमी मिळणार, रागावर नियंत्रण ठेवा

शुक्रवारी महालक्ष्मीची विधीवत पूजा केल्याने त्या प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताला धन-धान्याने संपन्न करतात, अशी मान्यता आहे, तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल ते आजच्या राशीभविष्यातून जाणून घेऊयात.

Libra/Scorpio Rashifal Today 16 July 2021 | आनंदाची बातमी मिळणार, रागावर नियंत्रण ठेवा
Libra_Scorpio
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jul 29, 2021 | 3:22 PM
Share

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : शुक्रवार 16 जुलै 2021 (Libra/Scorpio Rashifal). शुक्रवारचा दिवस हा देवी महालक्ष्मी यांना समर्पित असतो. शुक्रवारी महालक्ष्मीची विधीवत पूजा केल्याने त्या प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताला धन-धान्याने संपन्न करतात, अशी मान्यता आहे. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या शुक्रवारचं संपूर्ण राशीभविष्य (Libra/Scorpio daily horoscope of 16 july 2021 Tula And Vrishchik rashifal today)

तूळ (Libra), 16 जुलै

आनंदाची बातमी मिळाल्याने घरात आनंदाचं वातावरण राहील. विश्वासातील व्यक्तीचा योग्य सल्ला आणि मदतीने तुम्ही आपली गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवू शकाल. घरात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्याबाबत निर्णय होऊ शकतो.

इतरांनी दिलेल्या सल्ल्यांचा योग्यप्रकारे आणि गांभीर्याने विचार करा. आपल्या मर्यादांचाही विचार करा. विशेषत: रागावर नियंत्रण ठेवा. अचानकपणे अनावश्यक खर्च होऊ शकतो.

व्यवस्यासायत सुरु असलेल्या कामकाजांकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवा. व्यवसाय वाढवण्याबाबतचं काम शक्यतो आज करुच नका. प्रॉपर्टी संबंधित कामांमध्ये सावधानी बाळगा. त्यामुळे तुम्ही एखाद्या मोठ्या संकाटापासून वाचू शकता. नोकरीत प्रमोशन मिळू शकतं.

लव्ह फोकस – वैवाहिक जीवनात बाहेरच्या व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ देऊ नका.

खबरदारी – डोकेदुखी किंवा रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे काळजी घ्या.

लकी रंग – हिरवा लकी अक्षर –फ्रेंडली नंबर- 2

वृश्चिक (Scorpio), 16 जुलै

घरात जवळच्या नातेवाईकाचं आगमन होण्याची शक्यता आहे. त्या व्यक्तीसोबतचं नातेसंबंध आणखी दृढ होतील. गेल्या काही दिवसांपासून ज्या कामांममध्ये अडचणी येत होत्या ते कामं आज मार्गी लागण्याची शक्यता आहे.

मुलांना शांततेने समजवा. त्यांच्यावर आरडाओरड करु नका. अन्यथा त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. कोणतंही काम करण्याआधी त्याच्या चांगल्या आणि वाईट परिणामांचा विचार करा.

व्यवसायात काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. पण कोणतंही डील निश्चित करण्याआधी सर्व व्यवहार योग्यप्रकारे समजून घ्या आणि काळजीपूर्वक निर्णय घ्या. नोकरदार मंडळींनी मीटिंगमध्ये बोलताना योग्य शब्दांचा प्रयोग करावा.

लव्ह फोकस – पती-पत्नीच्या संबंधांमध्ये मधुरता राहील. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना जोडीदाराचा योग्य सल्ला घ्या.

खबरदारी – खांदेदुखी सारखे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे योगा आणि व्यायामावर लक्ष केंद्रीत करा.

लकी रंग – लाल लकी अक्षर –फ्रेंडली नंबर – 6

Libra/Scorpio daily horoscope of 16 july 2021 Tula And Vrishchik rashifal today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.

Follow Us
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....