Lunar Eclipse : आता पुढचे चंद्रग्रहण कधी लागणार? भारतात दिसणार की नाही?

काल 2023 या वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण झाले. हे ग्रहण भारतातून दिसल्याने याचे विशेष महत्त्व होते. यानंतर 2024 मध्ये चंद्रग्रहण कधी होणार आहे ते जाणून घेऊया. हे ग्रहण भारतात दिसणार की नाही या बद्दलही आपण माहिती घेऊया. तसेच कोणत्या नक्षत्रात हे ग्रहण लागणार हे पाहने देखील महत्त्वाचे आहे.

Lunar Eclipse : आता पुढचे चंद्रग्रहण कधी लागणार? भारतात दिसणार की नाही?
चंद्रग्रहणImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 29, 2023 | 12:55 PM

मुंबई : चंद्रग्रहण (Chandra Grahan) ही खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहणाला सूर्यग्रहणाप्रमाणे धार्मिक आणि पौराणिक महत्त्व आहे. ग्रहण ही वैदिक ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाची परिस्थिती आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आपल्या शरीरातील पाण्याचे प्रतिनिधित्व करतो. अनेक वेळा चंद्रग्रहण शुभ मानले जात नाही. या स्थितीत ज्यांच्या पत्रिकेत चंद्र निचस्थानी असलेल्या लोकांना सर्वाधिक त्रास होतो. यामुळे व्यक्तीला मानसिक तणाव आणि नैराश्याचा सामना करावा लागतो. आता आपण चंद्रग्रहण 2024 बद्दल अधिक तपशीलवार जाणून घेऊया.

2024 मध्ये चंद्रग्रहण कधी होईल?

चंद्रग्रहण दरवर्षी होते. तथापि त्यांचा कालावधी आणि संख्या भिन्न असू शकते. 2024 मध्ये फक्त एकच चंद्रग्रहण दिसणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण होईल. ते 25 मार्च 2024 रोजी होणार आहे. जे ग्रहण मानले जाणार नाही.

वर्षातील दुसरे चंद्रग्रहण 18 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. हे मुख्य चंद्रग्रहण असेल, मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणाचा सुतक काळ ग्राह्य राहणार नाही.

हे सुद्धा वाचा

चंद्रग्रहण 2024

  • हे चंद्रग्रहण कन्या आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात होईल. ग्रहणाचा कालावधी ४ तास ३९ मिनिटे असेल.
  • तिथी- फाल्गुन महिन्याची शुक्ल पक्ष पौर्णिमा
  • दिवस आणि तारीख- सोमवार, 25 मार्च 2024
  • चंद्रग्रहण सुरू होण्याची वेळ- सकाळी 10.23 वा
  • चंद्रग्रहण समाप्ती वेळ- दुपारी 03.02 वा.

कुठे दिसणार ग्रहण

आयर्लंड, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल, इटली, जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम, नॉर्वे, अमेरिका, जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि बहुतेक आफ्रिका.

 2024 खंडग्रास चंद्रग्रहण

2024 सालचे मुख्य चंद्रग्रहण खंडग्रास ग्रहण असेल. याला आंशिक ग्रहण असेही म्हणता येईल. हे चंद्रग्रहण पूर्वाभाद्रपद नक्षत्रात होईल. ग्रहणाचा कालावधी 1 तास 3 मिनिटे असेल. या ग्रहणाचा सुतक काल सकाळी 7.43 पासून सुरू होईल. तो सकाळी 8.46 पर्यंत चालेल. चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. जेव्हा खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होईल, तेव्हा भारतात चंद्र मावळला असेल. तथापि, जेव्हा ग्रहणाचा मध्यवर्ती भाग सुरू होईल तेव्हा उत्तर-पश्चिम भारत आणि उत्तर-दक्षिण शहरांमध्ये चंद्रास्त होईल. काही काळ चंद्रप्रकाश अंधुक होऊ शकतो. अशा प्रकारे भारतातील काही भागात आंशिक सावली दिसेल. मात्र, ते ग्रहण मानले जाणार नाही.

तिथी- भाद्रपद महिन्याची शुक्ल पक्ष पौर्णिमा

दिवस आणि तारीख- बुधवार, 18 सप्टेंबर 2024

चंद्रग्रहण सुरू होण्याची वेळ – भारतीय वेळेनुसार सकाळी ७.४३

चंद्रग्रहणाची समाप्ती वेळ – भारतीय वेळेनुसार सकाळी ८.४६

कुठे दिसणार चंद्रग्रहण- दक्षिण अमेरिका, पश्चिम आफ्रिका आणि पश्चिम युरोप.

शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा.
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?.