Panchak 2024 : सावधान! या तारखेपासून लागतंय मृत्यू पंचक, अशी कामं चुकूनही करू नका

नवंवर्ष 2024 सुरु झालं असून काही शुभ तर काही अशुभ योगांची नांदी या वर्षातही पाहायला मिळणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात अशुभ असं मृत्यू पंचक लागणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या कालावधीत काही कामं करणं टाळलं पाहीजे असं सांगितलं आहे.

Panchak 2024 : सावधान! या तारखेपासून लागतंय मृत्यू पंचक, अशी कामं चुकूनही करू नका
Panchak 2024 : वर्षाच्या पहिल्याच महिन्यात लागणार अशुभ असं मृत्यू पंचक, या कामांपासून लांबच राहा
| Updated on: Jan 05, 2024 | 4:15 PM

मुंबई : ‘पंचक’ हा मराठी चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. बऱ्याच गंमतीजमती या निमित्त चित्रपटात पाहायला मिळतील. पण असं असलं तरी पंचक म्हणजे काय? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. ज्योतिषशास्त्रात पंचकाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. प्रत्येक महिन्यात एक पंचक पडतं. पंचक म्हणजे पाच दिवस. या दिवसांची गणना शुभ अशुभ अशी केली जाते. कोणत्या वाराला हे पंचक सुरु झालं आहे. त्यावरुन त्याची गणना शुभ अशुभ अशी केली जाते. चोर पंचक, अग्नि पंचक, मृत्यु पंचक, राज पंचक असे प्रकार आहेत. सोमवारी सुरु होणाऱ्या पंचकाला राज पंचक म्हंटलं जातं. हे शुभ पंचक आहे. शनिवारी सुरु होणाऱ्या पंचकाला मृत्यू पंचक म्हंटलं जातं. जेव्हा चंद्र दोन राशींसोबत पाच नक्षत्रातून संक्रमण करतो. अर्थात शतभिषा, उत्तराभाद्रपद, पूर्वाभाद्रपद, रेवती, पूर्वभाद्रपद आणि धनिष्ठा या नक्षत्रांतून गोचर करतो तेव्हा पंचक असल्याचं सांगितलं जातं.

कधी सुरु होणार पंचक जाणून घ्या?

हिंदू पंचांगानुसार 13 जानेवारीला रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी पंचक सुरु होणार आहे. हे पंचक 18 जानेवारीला सकाळी 3 वाजून 34 मिनिटांपर्यंत असणार आहे. हे पंचक शनिवारी सुरु होणार असल्याने याला मृत्यू पंचक म्हंटलं जातं. पंचकांच्या नावावरूनच याची तीव्रता ज्योतिषशास्त्रात अधोरेखित केली आहे. इतर पंचकांच्या तुलनेत प्रभावी असल्याचं सांगितलं गेलं आहे. या पंचक कालावधीत जातकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं. या कालावधीत अपघाताचं सर्वाधिक भय असतं.

या कालावधीत ही कामं टाळा

  • पंचक कालावधीत दक्षिण दिशेला प्रवास करू नये. जर करण्याची वेळ आली तर हनुमान चालिसेचं पठण करावं.
  • पंचक कालावधीत घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला तर दोष लागू नये यासाठी शवासोबत 5 कुश किंवा पिठाचे पुतळे ठेवले जातात. यांचं शवासोबत दहन केलं जातं.
  • मृत्यू पंचक कालावधीत छताचं काम करू नये. या कालावधीत केलेल्या छताखाली राहिलं की शांतता भंग पावते, असं ज्योतिषशास्तर सांगतं.
  • पंचकाच्या दरम्यान खाटही बनवू नये असं सांगितलं गेलं आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)