या 4 अक्षरांपासून नाव असणारे व्यक्ती अत्यंत रागीट स्वभावाचे असतात

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 27, 2021 | 8:47 AM

ज्योतिष शास्त्रानुसार राशी तीन प्रकारे ओळखल्या जातात. पहिली ग्रहांच्या नक्षत्रांची गणना करुन काढली जाते, त्याला चंद्र राशी म्हणतात. दुसरे तुमच्या जन्मतारखेनुसार काढली जाते, त्याला सूर्य राशी म्हणतात आणि तिसरी तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरापासून काढली जाते, त्याला नाव राशी म्हणतात.

या 4 अक्षरांपासून नाव असणारे व्यक्ती अत्यंत रागीट स्वभावाचे असतात
Zodiac Signs

मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार राशी तीन प्रकारे ओळखल्या जातात. पहिली ग्रहांच्या नक्षत्रांची गणना करुन काढली जाते, त्याला चंद्र राशी म्हणतात. दुसरे तुमच्या जन्मतारखेनुसार काढली जाते, त्याला सूर्य राशी म्हणतात आणि तिसरी तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरापासून काढली जाते, त्याला नाव राशी म्हणतात.

या सर्व राशी एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करतात. या राशींचे स्वरुप आणि सत्ताधारी ग्रहाचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर कुठेतरी परिणाम होतो. येथे जाणून घ्या त्या चार राशींबद्दल ज्यांचा स्वभाव बराच रागीट मानला जातो. जेव्हा हे लोक चिडतात तेव्हा ते काहीही बोलून बसतात. पण त्यांचे मन अगदी स्वच्छ राहते. जाणून घ्या या राशींबद्दल.

B अक्षर

ज्या लोकांचे नाव B अक्षरापासून सुरू होते ते अत्यंत रागीट स्वभावाचे असतात. या लोकांमध्ये तग धरण्याची क्षमता नसते. थोडीशी चुकीची गोष्ट पाहून त्यांना राग येतो. कधीकधी ते रागाच्या भरात खूप मूर्खपणाच्या गोष्टी बोलतात. पुढे या वागण्यामुळे त्यांनाही खूप त्रास सहन करावा लागतो.

H अक्षर

ज्या लोकांचे नाव H अक्षराने सुरु होते, त्यांना त्यांचा स्वाभिमान खूप आवडतो. असे लोक त्यांच्या स्वाभिमानासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यांच्या रागावर त्यांचे नियंत्रण नसते. जरी हे लोक खूप भावनिक असतात आणि ज्यांच्याशी ते जुळतात ते त्यांच्यासोबत पूर्ण एकनिष्ठतेने नाते निभावतात. त्यांना त्यांच्या आवडत्या लोकांसाठी काहीही ऐकायला आवडत नाही.

L अक्षर

L अक्षर असलेल्या लोकांना त्यांचा मुद्दा समजवून देण्याची सवय असते. त्यांचा राग त्यांच्या नाकावर असतो. पण जर कोणी प्रेमाने त्यांची काळजी घेतली तर ते सुद्धा पटकन शांत होतात. त्यांना कोणाबद्दल वाईट भावना नाहीत. पण, त्यांना स्वतःबद्दल आणि त्यांच्या जवळच्या लोकांबद्दल काहीही चुकीचे ऐकायला आवडत नाही.

P अक्षर

P अक्षर असणारे लोक सुद्धा खूप रागीट स्वभावाचे असतात. एकदा त्यांना राग आला की त्यांना शांत करणे खूप कठीण असते. पण हे लोक मनाचे स्वच्छ असतात. त्यांच्या मनात कोणाबद्दल चुकीची भावना नसते. त्यांना कोणाचे दुःख पाहावत नाही.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या 4 राशीचे पती ठरतात सर्वोकृष्ट पती, जाणून घ्या तुमच्या राशीबाबत

Zodiac Signs | या 3 राशींच्या व्यक्तींवर कधीही विश्वास ठेवू नये, विश्वासघात होण्याची मोठी शक्यता असते

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI