Zodiac Signs | या दोन राशींच्या व्यक्तींनी कधीही लग्न करु नये, एकमेकांशी कधीही पटणार नाही

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशी कुठल्या ना कुठल्या ग्रहाशी संबंधित असते. प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे वेगळे स्वरुप आणि स्वभाव असतात. जर दोन ग्रहांचे स्वरुप एकमेकांशी समान असेल किंवा अनुकूल स्थितीत असेल तर त्यांना अनुकूल ग्रह म्हणतात. त्याचप्रमाणे, जेव्हा ते दोघे भिन्न स्वभावाचे असतात, तेव्हा त्यांना शत्रू ग्रह म्हणतात.

Zodiac Signs | या दोन राशींच्या व्यक्तींनी कधीही लग्न करु नये, एकमेकांशी कधीही पटणार नाही
Zodiac Signs

मुंबई : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशी कुठल्या ना कुठल्या ग्रहाशी संबंधित असते. प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे वेगळे स्वरुप आणि स्वभाव असतात. जर दोन ग्रहांचे स्वरुप एकमेकांशी समान असेल किंवा अनुकूल स्थितीत असेल तर त्यांना अनुकूल ग्रह म्हणतात. त्याचप्रमाणे, जेव्हा ते दोघे भिन्न स्वभावाचे असतात, तेव्हा त्यांना शत्रू ग्रह म्हणतात.

जर दोन शत्रू राशीच्या लोकांनी लग्न केले, तर त्यांना एकाच छताखाली एकत्र राहणे आणि शांततेने जगणे खूप कठीण होते. त्यांच्यात कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरुन भांडणे होतात. असे लोक त्यांच्या समजुतीच्या आधारेच त्यांचे संबंध सुधारु शकतात. येथे जाणून घ्या त्या राशींबद्दल ज्यांचं अजिबात एकमेकांशी पटत नाही.

मेष आणि कर्क

मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळाची प्रकृती खूपच ज्वलंत आहे. त्यांना खूप राग येतो. हे लोक खूप निडर आणि बोलके असतात आणि आधी स्वतःचा विचार करतात. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. कर्क राशीचे लोक शांत स्वभावाचे असतात, पण त्यांचे मन खूप चंचल असते. हे इतरांबाबत एखाद्या आईप्रमाणे विचार करतात. यामुळे ते त्यांच्या नातेसंबंधात काही अपेक्षा ठेवतात. मेष आणि कर्क राशीच्या या विरुद्ध स्वभावामुळे त्यांच्यात मतभेद होतात. हे लोक कधीही शांत जीवन जगू शकत नाहीत.

कुंभ आणि वृषभ

वृषभ राशीचा स्वामी शुक्रदेव आणि कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. कुंभ राशीचे लोक स्वतंत्र विचारांचे असतात. तर वृषभ राशीच्या लोकांचा स्वभाव हट्टी असतो. अशा प्रकारे दोन्ही राशी चिन्हे एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. जर त्यांना एकत्र राहायचे असेल तर भांडणाची परिस्थिती उद्भवते. म्हणूनच त्यांच्या वैवाहिक नात्यामध्ये चढ-उतार येतात. त्यांना कधीही आदर्श जोडपे मानले जाऊ शकत नाही.

मीन आणि मिथुन

मीन राशीचा स्वामी गुरु आहे, तर मिथुनचा स्वामी बुध आहे. या दोन ग्रहांमध्ये वैर आहे. मिथुन राशीच्या लोकांना समजणे थोडे कठीण आहे. हे लोक मनोरंजक आहेत आणि त्यांना सर्व कामे त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार करायची आहेत. तर मीन राशीचे लोक शांत आणि स्थिर मनाचे असतात. अशा परिस्थितीत हे दोघेही एकमेकांना अजिबात आवडत नाहीत. त्यांच्यात अजिबात संवाद नाही. जर त्यांनी लग्न केले तर काहीना काही अडचणी येतच राहातील.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्ती ठरतात सर्वोत्तम कर्मचारी आणि सहकारी

Zodiac Signs | या राशींच्या व्यक्तींचा घटस्फोट होण्याची अधिक भीती, जाणून घ्या कारण

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI