Daily Horoscope 13 May 2022,व्यावसायिक कामे वेळेवर पार पडतील, कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील

Daily Horoscope 13 May 2022,व्यावसायिक कामे वेळेवर पार पडतील, कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील
zodiac

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ? आजचे तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

May 13, 2022 | 5:05 AM

मुंबई : आजचे राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे नाते, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा (Challenge) सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य (Daily Horoscope) वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.

कर्क –

कोणतंही काम करण्याआधी पूर्ण योजना आखणं त्याचं योग्य प्रारूप तयार करणं तुम्हाला कामात चुका होण्यापासून वाचवू शकतं. घरातील कामं किंवा रिनोव्हेशनचं काही काम करत असाल तर त्याकामासाठी योग्य वेळ द्या. भावंडांसोबत किंवा जवळचे संबंध असलेल्या नातोवाईकांसोबत संबंध खराब होण्याची स्थिती निर्माण होईल. थोडं सावधान रहा. बाहेरच्या कामात वेळ वाया घालवू नका. त्याचे कोणतेही चांगले परिणाम होणार नाहीत. व्यवसायातील कामं सामान्यच राहतील. तुम्हाला कोणत्यातरी कामाची जबाबदारी मिळेल. काम वेळेवर पूर्ण केलं तर तुम्हाला त्याचे लाभदायक परिणाम मिळतील. नोकरदार वर्गातील लोकांना तुमचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत करणं गरजेचं आहे.

लव फोकस – नवरा बायकोच्या नात्यात आपापसातील सामंजस्याची समस्या असेल. याचा परिणाम घरातील वातावरणवार पडू देऊ नका. प्रेम संबंध रोमॅण्टीक तसंच खुश राहतील.

खबरदारी – सर्दी, खोकला तसंच घशात इंफेक्शनची समस्या वाढू शकते. स्वत: ची योग्य काळजी घ्या.

शुभ रंग – केसरी

भाग्यवान अक्षर – अ

अनुकूल क्रमांक – 8

सिंह –

तुमच्या बैद्धिक कौशल्याने तुम्ही समाजात सकारात्मक परिणाम मिळवू शकाल. ज्यामुळे समाजात तसंच नातेवाईकात तु्म्ही वर्चस्व मिळवू शकाल. मुलांना करिअर संबंधी शुभ सूचना मिळतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. तुमचं अधिक शिस्तप्रिय असणं दुसऱ्यासाठी त्रास ठरू शकतं. वेळेनुसार तुमच्या व्यवहारात बदल घडवून आणणं गरजेचं आहे. दुसऱ्यांच्या गोष्टीत हस्तक्षेप करु नका. आपल्या कामाशी काम ठेवा. कामाच्या ठिकाणी स्वत: उपस्थिती राहणं गरजेचं आहे. नाहीतर तिथे व्यवस्थेत काही कमतरता भासू शकते. त्यासाठी भाग्याला दोषी न ठरवता आपल्या कार्यप्रणाली मध्ये बदल करा. सध्याची स्थिती पाहता संयम राखणं गरजेचं आहे.

लव फोकस – नवरा बायकोमध्ये भावनात्मक जवळीक वाढेल. प्रेमप्रकरणात मर्यादा राखणं गरजेचं आहे.

खबरदारी – विचार सकारात्क ठेवा. चुकीच्या विचारामुळे तुमच्यामध्ये तणाव आणि डिप्रेशन सारखी स्थिती निर्माण होऊ शकते.

शुभ रंग – सफेद

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 9

कन्या –

नियोजनबद्ध काम तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामात तुमचं ध्येया पर्यंत पोहचवेल. रखडलेले पैसे मिळतील. काही वेळ मुलांसोबत बोलल्याने त्यांच मनोबल चांगलं राहील. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाप्रती दुर्लक्ष करणं नुकसानदायक पडू शकतं. सोशलमीडियावर फालतू वेळ वाया घालवू नका. व्यवसायात कोणतंह नवं काम सुरू करायचं किंवा विस्तार करायचा विचार असेल तर त्याबाबत पुन्हा विचार करावा. नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस चांगला. सहकाऱ्यांच सहकार्य लाभेल.

लव फोकस – घरातील सर्व सदस्यांचे आपापसातील संबंध चांगले राहतील. पण, प्रेम प्रकरणात तणावाची स्थिती राहिल.

खबरदारी – तणाव तसंच वातावरणाती बदलामुळे होणाऱ्या आजारापासून सावध रहा. आयुर्वेदिक औषधं फायदेशीर ठरतील.

शुभ रंग – बदामी

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 5

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें