AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahu Ketu Story : अशा प्रकारे झाला होता राहूचा जन्म, पुराणात दिली आहे माहिती

राहु नेहमीच वाईट परिणाम देतो असे नाही. राहूबद्दल जोतिषशास्त्रात असे म्हणतात की, जेव्हा राहू चांगले परिणाम देतो तेव्हा दुसरा कोणताही ग्रह त्याची बरोबरी करू शकत नाही. हा एक असा ग्रह आहे जो रात्रीतून नशीब घडवतो.

Rahu Ketu Story : अशा प्रकारे झाला होता राहूचा जन्म, पुराणात दिली आहे माहिती
राहूImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 26, 2023 | 12:01 PM
Share

मुंबई : श्रीमद भागवत पुराणानुसार महर्षि कश्यप यांची पत्नी दानू हिला विप्रचित्ती नावाचा मुलगा होता ज्याचा विवाह हिरण्यकश्यपूची बहीण सिंहिका हिच्याशी झाला होता. राहूचा (Importance of Rahu in Astrology) जन्म सिंहिकेच्या गर्भातून झाला, म्हणूनच राहूचे नाव सिंहिकेय आहे. भगवान विष्णूच्या प्रेरणेने जेव्हा देव आणि दानवांनी  सागर मंथन केले तेव्हा त्यातून इतर रत्नांव्यतिरिक्त अमृतही प्राप्त झाले. भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून देव आणि दानवांना मोहिनी घातली आणि स्वतः अमृत वाटण्याचे काम केले आणि प्रथम देवांना अमृत पाजण्यास सुरुवात केली. राहूला संशय आला आणि तो देवांचा वेष धारण करून सूर्यदेव आणि चंद्रदेवांच्या जवळ बसला.

विष्णूने राहूला अमृत अर्पण सुरू करताच सूर्य आणि चंद्राने विष्णूला त्याची माहिती दिली, कारण त्यांनी राहूला ओळखले होते. त्याचवेळी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने राहूचे डोके धडापासून वेगळे केले. पण त्याआधी राहूच्या घशात अमृताचे काही थेंब गेले होते, त्यामुळे तो मस्तक आणि शरीर या दोन्ही रूपात जिवंत राहिला. मस्तकाला राहू आणि धडाला केतू म्हणतात.

राहूदेखील शुभ फल देतो

राहु नेहमीच वाईट परिणाम देतो असे नाही. राहूबद्दल जोतिषशास्त्रात असे म्हणतात की, जेव्हा राहू चांगले परिणाम देतो तेव्हा दुसरा कोणताही ग्रह त्याची बरोबरी करू शकत नाही. हा एक असा ग्रह आहे जो रात्रीतून नशीब घडवतो. तो राजाला रंक आणि रंकाला राजा करू शकतो. याचा अर्थ राहु शुभ आणि अशुभ दोन्ही फल देतो. राहू पत्रिकेतील स्थान आणि व्यक्तीच्या कर्मांच्या आधारावर परिणाम देतो.

राहू मजबूत करण्यासाठी काय करावे?

  • अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.
  • गरिबांना दान करा.
  • राहू यंत्राची स्थापना करा.
  • स्वयंपाकघरात जेवण करा.
  • शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका.
  • तसेच शिव सहस्रनाम आणि हनुमंत सहस्रनामाचे पठण करा.
  • विद्येची देवी सरस्वती ही राहूची आवडती देवी मानली जाते, सरस्वतीची पूजा केल्याने राहूचे दोषही दूर होतात.
  • कोणत्याही प्रकारची नशा करू नका.
  • चुकीच्या संगतीपासून दूर राहा.
  • कोणाचेही नुकसान करू नका.
  • स्वच्छतेचे नियम पाळा.
  • कर्ज घेऊ नका.
  • आळसापासून दूर राहा.
  • वाणी चांगली ठेवा.
  • फाटलेले आणि घाणेरडे कपडे घालू नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.