
जून 2025 मध्ये ग्रहांचा खास योग बनत आहे, तब्बल शंभर वर्षांनंतर असा योग तयार होत आहे. यापूर्वी 1925 मध्ये असा योग निर्माण झाला होता. शंभर वर्षानंतर प्रथमच एकाचवेळी भद्र आणि मालव्य राजयोग सोबत येणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार हे दोन्ही राजयोग खूपच शुभ असतात, जेव्हा हे दोन्ही राजयोग एकत्र येतात तेव्हा व्यक्तीचं आयुष्यच बदलून जातं. त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात सर्व क्षेत्रात यशच यश मिळतं. पदोन्नती होते, धनलाभ होतो. मान-सन्मान वाढतो.
जेव्हा शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे, तेव्हा मालव्य राजयोग तयार होणार आहे. तेव्हाच बुध ग्रह मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे, त्यामुळे भद्र योग देखील तयार होणार आहे. भद्र राजयोग आणि मालव्य राजयोग हे दोन्ही योग तब्बल शंभर वर्षानंतर प्रथमच सोबत येणार आहे. जाणून घेऊयात या विशेष योगाचा कोणत्या राशींवर शुभ परिणाम होणार आहे.
वृषभ रास – वृषभ राशींच्या लोकांसाठी भद्र राजयोग आणि मालव्य राजयोग हे दोन्ही योग खूपच शुभ ठरणार आहेत. मालव्य योगामुळे वृषभ राशींच्या लोकांच्या आत्मविश्वामध्ये प्रचंड वाढ होणार आहे. करिअरमध्ये नव्या संधी मिळणार आहेत. प्रमोशनचे योग आहेत. सोबतच काही नव्या जिम्मेदारी देखील मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही जर कुठे पूर्वी गुंतवणूक केली असेल तर त्यातून देखील मोठा लाभ मिळू शकतो.
सिंह राशी – सिंह राशींच्या लोकांसाठी हा राजयोग करिअर आणि आर्थिक प्रगतीच्या दृष्टीकोणातून खूपच शुभ ठरणार आहे. हे दोन्ही राजयोग तुमच्या कुंडलीच्या कर्म आणि आय योगात निर्माण होत आहेत. त्यामुळे तुमच्या सर्व आर्थिक समस्या सुटणार आहेत. मोठा जॅकपॉट तुमच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
कन्या राशी – कन्या राशीसाठी सुद्धा हा योग खूपच शुभ असणार आहे. या काळात या राशींच्या लोकांचे सर्व कामे मार्गी लागणार आहेत. अचानक धनलाभ देखील होऊ शकतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)