AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today 9th October 2026 : 9 ऑक्टोबरचा दिवस कोणासाठी घेऊन येणार खुशखबर ? जाणून घ्या

Horoscope Today 9th October 2026, Friday in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा राशीभविष्य.

Horoscope Today 9th October 2026 : 9 ऑक्टोबरचा दिवस कोणासाठी घेऊन येणार खुशखबर ? जाणून घ्या
| Updated on: Oct 08, 2026 | 9:43 PM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 9th October 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

तुमची क्षमता सिद्ध करण्याची आणि एखादे नवीन काम सुरू करण्याची संधी मिळू शकते. आत्मविश्वास आणि उत्साह चांगला राहील. हातात घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न कराल. मात्र, इतरांना विनाकारण सल्ला देणे टाळा; तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर विशेष लक्ष द्यावे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीचे आगमन होऊन प्रेमाची नवी सुरुवात होऊ शकते.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

चांगल्या संकेतांनी दिवस सुरू होईल. आर्थिक लाभासोबत एखादी आनंदाची बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल आणि त्यामुळे अनेक कामे सहज पूर्ण होतील. मुलांसोबत फिरण्याचा किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा योग येईल. विरोधकांवर मात करण्यासाठी तुमचा आत्मविश्वास आणि हुशारी कामी येईल. मात्र, महत्त्वाच्या कामांसाठी इतरांवर पूर्णपणे अवलंबून राहणे टाळा. घरात एखाद्या शुभ कार्याची किंवा मंगल कार्यक्रमाची तयारी सुरू होण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना घाई न करता शांतपणे विचार करा मगच पुढे जा. विशेषतः आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक सावध राहा आणि अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नका. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून मिळणारा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो आणि कामाला नवी दिशा मिळू शकते. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. जीवनसाथीसोबत एखाद्या छोट्या कारणावरून मतभेद होऊ शकतात. प्रेमाने आणि संयमाने परिस्थिती हाताळल्यास वाद टाळता येईल.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

तुमच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. मित्र आणि जवळच्या व्यक्तींचे सहकार्य मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. आरोग्याशी संबंधित एखादी किरकोळ समस्या त्रास देऊ शकते, मात्र लवकरच आराम मिळेल. व्यवसायात काही अडचणी निर्माण झाल्या तरी तुमच्या बुद्धिमत्तेने त्यावर तोडगा काढता येईल. गुंतवणूक किंवा शेअर बाजारात पैसे लावण्याचा विचार असल्यास घाई करू नका. योग्य माहिती घेतल्यानंतरच निर्णय घ्या. तुमच्या एखाद्या चांगल्या कामाचे कौतुक होऊन सन्मान मिळण्याची शक्यता आहे. भावंडांसोबतचे संबंधही प्रेमळ राहतील.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

तुमच्या बोलण्यामुळे नातेसंबंधांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बोलताना रागावंर कंट्रोल ठेवा आणि जपून शब्द वापरा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मनाला तुमचे बोलणं लागू शकते. मात्र, प्रेमाने आणि समजूतदारपणे वागल्यास घरातील वातावरण आनंदी ठेवता येईल. प्रेमसंबंधांशी संबंधित एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक किंवा गुरुजनांचा सल्ला उपयोगी ठरेल. बऱ्याच काळापासून हरवलेली एखादी मौल्यवान किंवा आवडती वस्तू अचानक सापडू शकते, ज्यामुळे जुन्या आठवणी जाग्या होतील.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

काही कौटुंबिक गोष्टींमुळे व्यस्त रहाल. जुनी समस्या पुन्हा समोर आल्याने थोडी चिंता वाढू शकते. नोकरीच्या निमित्ताने प्रवास करण्याची किंवा दुसऱ्या शहरात जाण्याची संधी मिळू शकते. राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना नवीन पद, जबाबदारी किंवा सन्मान मिळण्याची शक्यता आहे. यश मिळाल्यानंतरही नम्रता कायम ठेवा. विरोधकांच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नका. मालमत्तेशी संबंधित एखाद्या विषयाला कायदेशीर वळण लागू शकते, त्यामुळे धावपळ वाढू शकते.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

आजचा दिवस काम, जबाबदाऱ्या आणि शिस्त यामध्ये व्यस्त राहील. कामात कोणतीही निष्काळजीपणा करू नका, कारण छोटीशी चूकही मोठी अडचण निर्माण करू शकते. एखादा मित्र गुंतवणुकीचा प्रस्ताव देऊ शकतो; मात्र केवळ ओळखीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून निर्णय घेऊ नका. उत्पन्न वाढले तरी खर्चही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे ठरेल. शेअर बाजार किंवा मोठ्या गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. विचारपूर्वक घेतलेला प्रत्येक निर्णय तुम्हाला फायदा करून देईल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

आज वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. तुमची छोटीशी चूकही अडचण निर्माण करू शकते. आधीपासून काही आरोग्यविषयक समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. जुन्या मित्राची आठवण आल्याने मन भावुक होऊ शकते. भावंडांमधील जुना गैरसमज किंवा नाराजी संवादातून दूर होईल आणि नात्यात पुन्हा आपुलकी वाढेल. मालमत्तेच्या वाटणीशी संबंधित प्रकरण गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे. तसेच, इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात अनावश्यक हस्तक्षेप करणे टाळा.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

तुमची आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे, खुशखबर मिळू शकते. उत्पन्नाचा एखादा अतिरिक्त मार्ग खुला होऊ शकतो आणि त्यातून आर्थिक फायदा मिळेल. मात्र, त्याच वेळी खर्चही वाढू शकतो, त्यामुळे आर्थिक नियोजनाकडे लक्ष द्या. घरातील धार्मिक कार्यक्रमामुळे वातावरण शांत आणि सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा वाढेल. जीवनसाथीसोबतचे मतभेद कमी होऊन नात्यात पुन्हा प्रेम आणि जवळीक निर्माण होईल. आरोग्याची काळजी घ्या आणि विशेषतः आहाराच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

नोकरी किंवा व्यवसायातील कामात मन रमल्याने चांगली प्रगती करता येईल. मात्र, मुलांच्या मित्रपरिवाराकडे आणि त्यांच्या संगतीकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. भूतकाळातील चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्या. घरात पूजा, धार्मिक कार्यक्रम किंवा एखादे शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

हा दिवस आनंददायी आणि सकारात्मक असू शकतो. एकापाठोपाठ एक चांगल्या बातम्या मिळाल्याने मन प्रसन्न होईल. मुलांच्या यशामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. कुटुंबातील जुने मतभेद दूर करण्यासाठी आज योग्य वेळ आहे. त्यामुळे नात्यांमध्ये पुन्हा प्रेम आणि आपुलकी वाढेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी मित्राचा सल्ला उपयुक्त ठरू शकतो. प्रवासादरम्यान एखादी महत्त्वाची माहिती मिळू शकते, जी भविष्यात फायदेशीर ठरेल. व्यवसायात भागीदारी करण्याचा विचारही पुढे येऊ शकतो.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

मालमत्तेशी संबंधित व्यवहारासाठी दिवस अनुकूल ठरू शकतो. मात्र, कागदपत्रे तपासताना विशेष काळजी घ्या. चुकीची माहिती देऊन तुमची फसवणूक करण्याचा कोणी प्रयत्न करू शकतो, त्यामुळे कोणत्याही कागदावर नीट वाचल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. कुटुंबातील जुने मतभेद दूर करण्याची संधी मिळेल. घरातील व्यक्तींसोबत आनंदाने वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. एखाद्या नातेवाईकाची भेट होऊ शकते. संभाषण करताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा, कारण नकळत कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच