Rashifal 15 February 2021: वेळ तुमच्यासोबत, महत्त्वाची कामं आजच उरका, कोणत्या राशीत काय?

Today Rashifal 15 february 2021 : राशीभविष्य दिनांक 15 फेब्रुवारी 2021 (चंद्रराशीनुसार ) तुमचा आजचा दिवस कसा जाणार? काय असेल खास?

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:51 PM, 15 Feb 2021
Rashifal 15 February 2021: वेळ तुमच्यासोबत, महत्त्वाची कामं आजच उरका, कोणत्या राशीत काय?
राशीचक्र

मुंबई :  राशीभविष्य दिनांक 15 फेब्रुवारी 2021 (चंद्रराशीनुसार ) (Rashifal 15 february 2021) तुमचा आजचा दिवस कसा जाणार? काय असेल खास? काय काळजी घ्यावी लागणार? सर्व राशींचे भविष्य एकाच ठिकाणी

मेष | Aries

– आज आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.
-दिवसभरात तुम्ही भावनात्मक रुपानं सशक्त असल्याची जाणीव होईल.
– काम करताना तुमच्या संपूर्ण क्षमतेचा वापर करा.
-आर्थिक संकटही दूर होण्याची शक्यता आहे.
-तुमच्या नकारत्मक विचारांवर नियंत्रण ठेवा. काही गोष्टी कानामागे टाकलेल्या चांगल्या.

भाग्यशाली रंग- निळा, भाग्यशाली अंक- 8

———————

वृषभ | Taurus

-दिवसभर तुम्ही कामात पूर्णपणे व्यस्त असाल
-कामात सफलता मिळण्याची शक्यता जास्त
-तुमची कार्यालयातील प्रतिमा सुधारण्यास मदत
-आज खर्चांवर नियंत्रण ठेवा, खर्च जास्त होण्याची शक्यता
-कुणाच्याही सांगण्यावरुन निर्णय घेण्याआधी दहादा विचार करा

भाग्यशाली रंग- केसरी, भाग्यशाली अंक- 9

————————-

मिथुन | Gemini

– वेळ सध्या तुमच्यासोबत आहे, त्यामुळे महत्त्वाची कामं तातडीने सुरु करा
-अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या त्रासापासून मुक्ती मिळेल
-चांगल्या कामामुळं लोकांची, सहकाऱ्यांची प्रशंसा मिळेल
– मोठ्या माणसांचं म्हणणं ऐका, ते आज कामी येईल

भाग्यशाली रंग- गुलाबी, भाग्यशाली अंक- 5

————————-

कर्क | Cancer

-मित्र आणि कुटुंबीयांसोबतचे संबंध मजबूत करा, त्याचा फायदा होईल
-पैशाच्या गुंतवणुकीवर अधिक लक्ष द्या, फायद्याचा दिवस
-चिडचिडेपणा नियंत्रण ठेवा, त्यामुळे तोटा होण्याची शक्यता
-कुठल्याही गोष्टीवर काम करण्याआधी तिची संपूर्ण माहिती घ्या
-तरुणांना नोकरीसाठी मोठ्या ऑफर येऊ शकतात
-कार्यालयातील वातावरण आज थोडं तणावपूर्ण असू शकतं

भाग्यशाली रंग- तपकीरी, भाग्यशाली अंक- 1
————————–

सिंह | Leo

-कुठलंही काम करण्याआधी त्याची संपूर्ण माहिती घ्या
-मुलांना चांगलं यश मिळू शकतं, त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण
-समाजात मान, सन्मान वाढण्याचा अंदाज
-खर्चांवर नियंत्रण ठेवा, घराचं बजेट बिघडू शकतं
-नोकरीमध्ये चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे

भाग्यशाली रंग- हिरवा, भाग्यशाली अंक- 6

——————-

कन्या | Virgo

– मित्राची मदत करा, आत्मिक शांतता मिळेल
– नवीन लक्ष्य निर्धारित करा, फायदा होईल
-मुलांवर बारकाईने लक्ष ठेवा, चुकीच्या संगतीपासून त्यांना दूर ठेवा
-भावनिक होऊन आज कुठलाही निर्णय घेऊ नका
-व्यवहारिक दृष्टीकोण ठेऊन काम करणं फायद्याचं

भाग्यशाली रंग- लाल, भाग्यशाली अंक- 3

———————-

तूळ | Libra

– आत्मविश्वासाने काम करा, नोकरी-व्यवसायात फायदा होईल
– घरात नवीन गोष्ट घेण्यासाठी चांगला दिवस
– मित्रांसोबत वेळ घालवण्यापेक्षा कामावर लक्ष देणं अधिक फायद्याचं
– तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, होणारं चांगलं काम मोडू शकतं.
– आज खर्च वाढण्याची शक्यता, खर्च आणि कमाईचा ताळमेळ साधणं गरजेचं

भाग्यशाली रंग- नारंगी, भाग्यशाली अंक- 5

———————–

वृश्चिक | Scorpio

– प्रॉपर्टी खरेदी-विक्रीची कुठली योजना असेल तर त्यासाठी आजचा दिवस उत्तम
– तरुणांना आपल्या कामामध्ये यश येण्याची शक्यता
– तुमच्या जिद्दी स्वभावावर नियंत्रण ठेवा, होणारं काम बिघडू शकता
– जवळच्या नातेवाईकांसोबतचे संबंध खराब होण्याची शक्यता
– नवरा-बायकोच्या नात्यात जवळीकता वाढेल

भाग्यशाली रंग- गुलाबी, भाग्यशाली अंक- 9

———————–

धनू | Sagittarius

– तुमच्या मनानुसार आज अनेक गोष्टी घडताना दिसतील
– मागच्या चुकांपासून धडे घेऊन पुढची वाटचाल करणं उत्तम
– तुमच्या प्रिय व्यक्तीची भेट आज तुम्हा्ला आनंद देऊन जाईल
– घाईघाईत कुठलाही निर्णय घेऊ नका, तोटा होऊ शकतो
– नोकरी-व्यवसायात कार्यालयीन यात्रा फायदेशीर ठरु शकते

भाग्यशाली रंग- पिवळा, भाग्यशाली अंक- 8

———————–
मकर | Capricorn

– धार्मिक व्यक्तीसोबत तुमची भेट होऊ शकते
– विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगलं यश मिळण्याची शक्यता
-मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्यात वेळ वाया घालवू नका
– नोकरीत तुम्ही ऑफिस पॉलिटिक्सचा शिकार होऊ शकता
– नियमित व्यायाम करा, आरोग्यासाठी फायदेशीर असेल

भाग्यशाली रंग- निळा, भाग्यशाली अंक- 8

————————-

कुंभ | Aquarius

– अनेक दिवसांपासून थांबलेली कामं मार्गी लागतील
– कपडे-दागिने खरेदी करण्यासाठी चांगला दिवस
– नोकरी-व्यवसायामुळे घरी कमी वेळ देता येईल
– प्रॉपर्टी खरेदी-विक्री करताना सावधानी बाळगा
– नोकरीत बॉसची नाराजी सहन करावी लागू शकते

भाग्यशाली रंग- केसरी, भाग्यशाली अंक- 2

————————–

मीन | Pisces

– आनंदाची बातमी आल्याने कुटुंबात उल्हासाचं वातावरण
– घरात धार्मिक गोष्टी करण्याची योजना बनू शकते
– लवकर यश मिळवण्यासाठी शॉर्टकटचा वापर तोट्याचा ठरु शकतो
– इतरांच्या सल्ल्यावर गांभीर्याने लक्ष्य द्या, फायदा होईल
– नोकरी करणाऱ्यांवर बॉस खूश राहण्याची शक्यता, प्रमोशनचा योग

भाग्यशाली रंग- पांढरा, भाग्यशाली अंक- 7

————————-