AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samudrashastra: मानेवर तीळ असणारे लोकं असतात विशेष, काय सांगतं समुद्रशास्त्र?

समुद्रशास्त्रामध्ये शरीरावर असलेले चिन्ह तसेच शरीरावर असलेल्या तीळांचा अभ्यास करून संभाव्य भाकीत सांगीतले जाते. समुद्रशास्त्रानुसार प्रत्येक तीळ शुभ नसतो, काही तीळ अशुभ देखील असतात.

Samudrashastra: मानेवर तीळ असणारे लोकं असतात विशेष, काय सांगतं समुद्रशास्त्र?
समुद्रशास्त्रImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 31, 2023 | 10:02 PM
Share

मुंबई, समुद्रशास्त्राची (Samudrashastra) रचना समुद्र ऋषींनी केली होती. म्हणूनच त्याला समुद्रविज्ञान म्हणतात. समुद्रशास्त्रामध्ये शरीरावर असलेले चिन्ह तसेच शरीरावर असलेल्या तीळांचा अभ्यास करून संभाव्य भाकीत सांगीतले जाते. समुद्रशास्त्रानुसार प्रत्येक तीळ शुभ नसतो, काही तीळ अशुभ देखील असतात. सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या गळ्यात मधोमध तीळ असतो, ते शांतीप्रिय असतात. यासोबतच हे लोकं प्रॅक्टिकलही असतात आणि शेवटपर्यंत नाते टिकवून ठेवतात. त्याच वेळी, हे लोकं निष्पक्ष आणि सत्याची बाजू घेणारे असतात. ते खोटे सहन करत नाहीत. हे लोकं वक्तशीर असतात. तसेच, त्यांना कामात उशीर होणे आवडत नाही.  हे लोकं कामाच्या ठिकाणी मेहनतीच्या जोरावर नाव कमावतात.

मानेवर तीळ

मानेच्या वरच्या भागावर तीळ असेल तर ती व्यक्ती प्रामाणिक आणि विश्वासार्ह असते. तसेच, या लोकांना स्वातंत्र्य आवडते. हे लोक सरळ स्वभावाचे असतात. तसेच, तुम्ही या लोकांशी वैयक्तिक गोष्टी शेअर करू शकता. हे लोकं बचत करण्यात निष्णात असतात. त्याच वेळी, या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. म्हणजे हे लोकं संघाचे चांगले नेतृत्व करतात. हे लोकं ध्येयाच्या मागे पडले तर ते साध्य करूनच दाखवितात.

मानेच्या खालच्या भागावर तीळ

समुद्रशास्त्रानुसार ज्या लोकांच्या मानेच्या खालच्या भागात तीळ असते, ते लोक थोडे कामुक असतात. नातेसंबंध कसे टिकवायचे हे लोकांना चांगले माहित आहे. हे लोकं नात्यासाठी समर्पित असतात. तसेच या लोकांना प्रवास करायला आवडते. हे लोकही वक्तशीर असतात. त्यांना विलंब आवडत नाही. हे लोकं कर्म करण्यावर जास्त विश्वास ठेवतात. काम वेळेत पूर्ण करणे ही त्यांची सवय आहे. हे लोकं आस्तिक असतात. त्यांचे त्यांच्या लव्ह पार्टनरवर विशेष प्रेम असते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडी पुढे, बविआची शिट्टी जोरदार वाजणार?
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडी पुढे, बविआची शिट्टी जोरदार वाजणार?.
Jalna Muncipal Result Updates : जालन्यात भाजपचे भास्कर दानवेंची आघाडी!
Jalna Muncipal Result Updates : जालन्यात भाजपचे भास्कर दानवेंची आघाडी!.
महापालिका निकालात भाजपची आघाडी; सोलापुरात 16 जागांनी, तर लातूरमध्ये..
महापालिका निकालात भाजपची आघाडी; सोलापुरात 16 जागांनी, तर लातूरमध्ये...
शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईतून मोठा धक्का, समाधान सरवणकर हे पिछाडीवर
शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईतून मोठा धक्का, समाधान सरवणकर हे पिछाडीवर.
मुंबई महापालिका निकालाची मतमोजणी सुरू; पहिल्या कलांमध्ये भाजप आघाडीवर
मुंबई महापालिका निकालाची मतमोजणी सुरू; पहिल्या कलांमध्ये भाजप आघाडीवर.
सोलापूरमध्ये भाजप 18, काँग्रेस 3, शिवसेना 2 जागी आघाडीवर
सोलापूरमध्ये भाजप 18, काँग्रेस 3, शिवसेना 2 जागी आघाडीवर.
महायुतीची सुसाट आघाडी, अर्धशतक पूर्ण तर ठाकरे बंधूंची लक्षवेधी कामगिरी
महायुतीची सुसाट आघाडी, अर्धशतक पूर्ण तर ठाकरे बंधूंची लक्षवेधी कामगिरी.
कोल्हापूरात भाजप - कॉंग्रेसमध्ये कॉंटे की टक्कर! कोण आघाडीवर?
कोल्हापूरात भाजप - कॉंग्रेसमध्ये कॉंटे की टक्कर! कोण आघाडीवर?.
मुंबईत महायुती सुसाट तर ठाकरे बंधू पिछाडीवर, बघा कल काय सांगताय?
मुंबईत महायुती सुसाट तर ठाकरे बंधू पिछाडीवर, बघा कल काय सांगताय?.
नांदेडचे सुरुवातीचे कल काय? कोणाची आघाडी, कोणाची पिछाडी, पाहा व्हिडीओ
नांदेडचे सुरुवातीचे कल काय? कोणाची आघाडी, कोणाची पिछाडी, पाहा व्हिडीओ.