
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहांची स्थिती एका ठरावीक कालावधीनंतर बदलत असते. ग्रहांची स्थिती बदलली की ज्योतिषीय गणितही बदलतात. त्यात मित्र आणि शत्रू ग्रहाची युती आघाडी झाली तर आणखी धाकधूक वाढते. सध्या मीन राशीत पापग्रह म्हणून गणना होत असलेल्या शनि आणि राहुची युती सुरु आहे. शनि महाराजांनी 29 मार्चला मीन राशीत गोचर केल्यानंतर ही युती झाली आहे. ही युती 18 मेपर्यंत असणार आहे. 18 मे 2025 रोजी राहु मीन राशीत संध्याकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीत दीड वर्षे ठाण मांडून बसणार आहे. असं असताना शनि राहुची युती आणि 28 दिवस असणार आहे. यामुळे काही राशींचा गोल्डन टाईम सुरु झाला आहे. अचानक धनलाभ किंवा प्रगतीची दारं खुली होऊ शकतात.
मिथुन : या राशीच्या कर्मस्थानात राहु आणि शनिची युती झाली आहे. यामुळे या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. या कालावधीत कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम दिसणार आहे. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. तसेच नव्या नोकरीच्या शोधात असाल तर मिळण्याची शक्यता आहे. नवा उद्योगधंदा सुरु करण्यात योग या काळात जुळून येईल. या कालावधीत कमी मेहनतीत यश मिळेल. या काळात व्यवसायिकांना धनलाभ होऊ शकतो.
तूळ : या राशीच्या जातकांना राहु आणि शनिची युती लाभदायी ठरणार आहे. कारण या राशीच्या सहाव्या स्थानात ही युती होत आहे. न्यायालयीन प्रकरणात यश मिळू शकते. तसेच शत्रूंवर सहज विजय मिळवाल. इतकंच काय तर नवे आर्थिक स्रोत निर्माण होतील. अडकलेला पैसा परत मिळेल. तसेच गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. हातात घेतलेली कामं चुटकीसरशी पूर्ण कराल. नोकरी करणाऱ्या जातकांना चांगला लाभ मिळू शकतो.
धनु : या राशीच्या सुख स्थानात शनि राहुची युती होत आहे. त्यामुळे हा काळ या राशीसाठी चांगला जाणार आहे. भौतिक सुखांची अनुभूती या कालावधीत होईल. वाहन किंवा पॉपर्टी खरेदीचा योग जुळून येईल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण असेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)