AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्य आणि गुरूमुळे तयार होत आहे अर्धकेंद्र योग, 25 एप्रिलपासून या तीन राशींची होणार प्रगती

ग्रहमंडळात ग्रहांच्या स्थितीवर बरंच काही अवलंबून असतं. कोणता ग्रह कोणत्या राशीत बसला आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचं आकलन केलं जातं. 25 एप्रिलला सूर्य आणि गुरु यांच्या स्थितीमुळे अर्धकेंद्र योग तयार होणार आहे. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.

सूर्य आणि गुरूमुळे तयार होत आहे अर्धकेंद्र योग, 25 एप्रिलपासून या तीन राशींची होणार प्रगती
सूर्य गुरू अर्धकेंद्र योगImage Credit source: टीव्ही 9 तेलुगू
| Updated on: Apr 19, 2025 | 4:37 PM
Share

ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा गणलं जातं आणि बृहस्पतीला देवांचा गुरु मानलं जातं. त्यामुळे हे दोन्ही ग्रह शुभ असून त्यांचं स्थान महत्त्वाचं मानलं जातं. दोन्ही ग्रह एकत्र असतील किंवा त्यांच्यामुळे शुभ योग तयार होत असेल तर त्याचे चांगले परिणाम राशीचक्रावर होतात. या दोन्ही ग्रहांच्या स्थितीमुळे पद, सन्मान, धन संपत्ती, ज्ञान, बुद्धीत सकारात्मक बदल दिसतात. सूर्य आपल्या उच्च अशा मेष राशीत विराजमान आहे. तर गुरु ग्रह वृषभ राशीत आहे. दोन्ही ग्रहांची चाल सकारात्मक आहे आणि 25 एप्रिलला अर्धकेंद्र योग तयार करत आहेत. पंचांगानुसार, 25 एप्रिलला सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी सूर्य आणि गुर एकमेकांपासून 45 डिग्रीवर असतील. त्यामुळ अर्धकेंद्र राजयोग तयार होत आहे. गुरु आणि सूर्याच्या या स्थितीमुळे काही राशींना लाभ, तर काही राशींना सांभाळून राहावं लागणार आहे. चला जाणून घेऊयात तीन लकी राशींबाबत ज्यांना या अर्धकेंद्र योगाचा लाभ होणार आहे.

या तीन राशींना मिळणार लाभ

वृषभ : या राशीच्या जातकांना अर्धकेंद्र योग खूपच लाभदायी ठरणार आहे. या राशिच्या लग्न स्थानात गुरु आणि द्वादश भावात सूर्य आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना लाभ मिळू शकते.कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण राहील. गुरु कृपेने मानसन्मान वाढेल. जीवनात काही सकारात्मक बदल झाल्याचे दिसून येईल. विदेशात जाण्यासाठी तयारी करत असलेल्या जातकांना लाभ मिळू शकतो. नोकरी शोधण्याची वणवण संपेल. अर्थात नोकरी मिळू शकते. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या अडचणी दूर होतील.

मिथुन : या राशीच्या जातकांना अर्धकेंद्र योग फायदेशीर ठरेल. या जातकांना आनंदाची बातमी मिळू शकते. अध्यात्माकडे कल वाढेल आणि धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल. थोड्याशा मेहनतीने यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना कामाच्या ठिकाणी योग्य मानसन्मान मिळेल. शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

वृश्चिक : या राशीच्या जातकांना प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. काही ठिकाणी धनलाभ होऊ शकतो. सूर्य कर्मभावात असल्याने नोकरी धंद्यात अपेक्षित प्रगती अनुभवता येईल. नोकरीच्या ठिकाणी एखादी मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. शत्रूपक्षावर या कालावधीत हावी व्हाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच प्रगतीची नवी दारं खुली होतील. न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.