दहा वर्षानंतर मंगळ-शनिचा घातक षडाष्टक योग! या राशींचं टेन्शन वाढणार, या काळात जरा सांभाळूनच
ग्रहमंडळात ग्रहांची स्थिती बदलत असते. त्याचा परिणाम राशीचक्रावर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शनि आणि मंगळ हे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे षडाष्टक योग तयार होणार आहे. यामुळे तीन राशीच्या जातकांना फटका बसणार आहे.

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवरून बरंच काही ठरवलं जातं. तुमच्यासाठी येणारा काळ कसा जाणार आहे? कोणता ग्रह अनुकूल, तर कोणता ग्रह प्रतिकूल हे ठरवलं जातं. असं असताना सर्वांची नजर ही शनिच्या स्थितीकडे असते. कारण शनि महाराज राशीत असताना काय करतात याची प्रचिती आतापर्यंत अनेकांना आली आहे. त्यात आता शनि आणि मंगळामुळे एक विचित्र योग तयार होत आहे. भूमिपूत्र मंगळ ग्रह सध्या कर्क राशीत विराजमान आहेत. या राशीत 7 जून 2025 पर्यंत राहणार आहेत. त्यानंतर सिंह राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रह सिंह राशीत आल्यानंतर मीन राशीतील शनिसोबत एक अशुभ असा षडाष्टक योग तयार होणार आहे. यामुळे काही राशीच्या जातकांना सांभाळून राहावं लागणार आहे. या काळावधीत आर्थिक नुकसान किंवा आरोग्याची तक्रार उद्भवू शकते.
या राशीच्या जातकांना बसणार फटका
वृश्चिक : शनि मंगळापासून तयार होणारा षडाष्टक योग या राशीच्या जातकांची चिंता वाढवणारा आहे. काही गोष्टींवर अचानक तणाव वाढेल. नोकरी करणाऱ्या जातकांना कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे हातातून काही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या कालावधीत कौटुंबिक कलहाला सामोरं जावं लागू शकतं.
कुंभ : या राशीच्या जातकांना या कालावधी प्रतिकूल असणार आहे. या काळात अडचणींचा डोंगर उभा राहणार आहे. त्यामुळे कोणालाही आर्थिक मदत करण्यापूर्वी दहावेळा विचार करा. कारण दिलेले पैसे परत मिळतील का नाही याची काही गॅरंटी नाही. नोकरीच्या ठिकाणी वारंवार काढून टाकण्याची भीती सतावत राहील. व्यवसायातही उलथापालथ होईल. या कालावधीत खर्चावर नियंत्रण ठेवा.
कन्या : या राशीच्या जातकांना षडाष्टक योग त्रासदायक ठरणार आहे. कोणतीच गोष्ट धड होणार नाही, यामुळे मानसिक त्रासाला सामोरं जावं लागेल. एक गोष्ट हाती घेतली की ती पूर्ण होताना अडचणींचा डोंगर उभा राहील. त्यामुळे भांडणं होणार नाहीत याची काळजी घ्या. जे काही चाललं आहे त्यात आपलं आपलं ग्रहमान ठीक नाही असं समजून घ्या. तसेच वेळीच आपली चूक कबूल करा आणि पुढच्या कामाला लागा.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
