AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shani Surya Gochar 2023: मकर राशीमध्ये सुर्य आणि शनिची युती, ‘या’ चार राशींवर होणार सर्वाधीक परिणाम

सूर्याचे हे संक्रमण धनु राशीसह या चार राशींसाठी हानिकारक ठरू शकते. चला जाणून घेऊया या चार राशी कोणत्या आहेत.

Shani Surya Gochar 2023: मकर राशीमध्ये सुर्य आणि शनिची युती, 'या' चार राशींवर होणार सर्वाधीक परिणाम
सुर्य गोचरImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 10, 2023 | 8:43 AM
Share

मुंबई, वेदांमध्ये सूर्याला जगाचा निर्माता म्हंटले आहे. सुर्यामुळेच पृथ्वीवर जीवन आहे. त्याला ग्रहांचा राजा म्हणतात. भगवान सूर्य 14 जानेवारीला संध्याकाळी मकर राशीत प्रवेश करणार आहेत. यासह, त्यांचा मकर राशीत शुक्र आणि शनिसोबत दुर्मिळ संयोग (Sun Saturn Transit) होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी  (Makar Sankranti 2023) सूर्य आणि शनि यांची भेट 30 वर्षांनी होणार आहे. म्हणूनच ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून शनि आणि सूर्याचा हा संयोग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण सूर्य आणि शनी पिता-पुत्र आहेत मात्र दोघेही परस्पर विरोधी आहेत. सूर्याचे हे संक्रमण धनु राशीसह चार राशींसाठी हानिकारक ठरू शकते. चला जाणून घेऊया या चार राशी कोणत्या आहेत, ज्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

या चार राशींवर होणार परिणाम

  1. सिंह: सिंह राशीच्या लोकांना मातृपक्षाकडून वाईट बातमी मिळू शकते. या काळात कोणालाही कर्ज देऊ नका. तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. कुटुंबात वडील किंवा वडिलांसारख्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या.
  2. तूळ: तूळ राशीच्या लोकांना मकर राशीत सूर्याच्या भ्रमणामुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. मित्र किंवा नातेवाईकाकडून वाईट बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवनातही उलथापालथ होऊ शकते. प्रवासाचा कार्यक्रम केला जात असेल तर काळजी घ्या. चोरी होऊ शकते. या काळात तुम्हाला खूप संयमाने चालावे लागेल.
  3. धनु: या काळात कुटुंबाची काळजी घ्या आणि नातेसंबंध खराब होऊ देऊ नका. गुप्तता पाळा. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि कठोरपणे बोलणे टाळा. डोळ्यांशी संबंधित समस्या त्रासदायक ठरू शकतात.
  4. कुंभ: या काळात तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. जे तुम्हाला खाली आणण्याचा प्रयत्न करत होते ते यशस्वी होऊ शकतात. हे संक्रमण जीवनात उलथापालथ निर्माण करेल. तुमच्यावर कामाचा ताण आणि मानसिक ताण राहील. समजूतदारपणे प्रकरणे सोडवणे चांगले होईल. इतर कोणालाही कर्ज देणे टाळा, नुकसान होऊ शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?