Shani Gochar : जूनच्या या तारखेपासून शनिदेव होणार वक्री, चार राशींच्या अडचणीत होणार वाढ

ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायदेवतेचा दर्जा देण्यात आला आहे. शनिदेव जातकाच्या कर्मानुसार फळं देतात. त्यामुळे भल्याभल्यांना घाम फुटतो. चला जाणून घेऊयात शनिदेवांची जूनमध्ये कशी असेल स्थिती..

Shani Gochar : जूनच्या या तारखेपासून शनिदेव होणार वक्री, चार राशींच्या अडचणीत होणार वाढ
Shani Gochar : शनिदेव वक्री होणार असल्याने चार राशींचं टेन्शन वाढणार, वाचा कधीपर्यंत असेल ही स्थिती
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 5:59 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव सध्या स्वरास असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहेत. त्यामुळे मकर, कुंभ आणि मीन राशीला साडेसाती सुरु आहे. तर कर्क आणि वृश्चिक राशी अडीचकीच्या फेऱ्यात आहेत. त्यात वैयक्तिक कुंडलीनुसार जातकांना महादशा आणि अंतर्दशेचा सामना करावा लागतो. शनिदेवत न्यायप्रिय असल्याने जातकाला कशाचीही तमा न बाळगता शासन करतात. त्यामुळे शनि गोचराकडे ज्योतिषांसह जातकांचं बारकाईने लक्ष असतं. आता गोचर कुंडलीनुसार शनिदेव 17 जूनपासू वक्री होत आहेत. याचा प्रभाव राशीचक्रावर दिसून येईल.

शनिदेव 17 जूनपासून कुंभ राशीत वक्री होत आहे. शनिदेवांची वक्री अवस्था 4 नोव्हेंबर 2023 पर्यंत राहील. या दरम्यान चार राशीच्या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे काही ज्योतिषीय उपाय करून तात्पुरता दिलासा मिळू शकतो. चला जाणून घेऊयात वक्री काळात कोणत्या राशीच्या जातकांनी सांभाळून राहावं ते…

मेष : या राशीच्या जातकांना 17 जून ते 4 नोव्हेंबरपर्यंत सांभाळून राहावं लागेल. काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात काही मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. नोकरीच्या ठिकाणी जातकांना चढउतार अनुभवायला मिळतील. व्यवसाायत नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळात शिवाची आराधना करून दिलासा मिळवता येईल.

कर्क : या राशीचे लोक शनि अडीचकीच्या प्रभावाखाली आहे. त्यामुळे या काळात गाडी चालवताना काळजी घ्या. लांबचा प्रवास करणं शक्यतो टाळा. नोकरी करणाऱ्या जातकांना मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. या काळात दुर्गा सप्तशती आणि दुर्गा देवीची उपासना केल्यास दिलासा मिळेल.

तूळ : या राशीच्या जातकांनाही शनिच्या प्रभावातून जावं लागेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नकारघंटाच ऐकायला मिळेल. त्यामुळे नोकरीत बदल करणं टाळा. आई वडिलांच्या तब्यतेची काळजी घ्याय प्रत्येक दिवशी गणपतीची पूजा करा आणि बुधवारी गणेश आराधना करण्यास विसरू नका.

कुंभ : शनिदेव सध्या स्वरास असलेल्या कुंभ राशीत आहेत. या राशीत शनिदेव जूनपासून वक्री असणार आहेत. त्यामुळे या काळात जातकांना अनेक संकटांना सामोरं जावं लागेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी दहावेळा विचार करा. वैवाहिक जीवनातही अडचणी येतील. शिव रुद्राभिषेकासह रोज शिव तांडव स्तोत्राचं पठण करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.