
मुंबई : ग्रहांमध्ये सूर्याला राजाचा दर्जा देण्यात आला आहे. ग्रहमंडळातील ग्रह हे सूर्याभोवती भ्रमण करत असतात. सूर्याच्या तेजाचा प्रभाव सर्वच ग्रहमंडळावर पडतो. त्यामुळे सूर्याची स्थिती ज्योतिषशास्त्रात महत्त्वाची मानली गेली आहे. सूर्य एका राशीत जवळपास एक महिनाभर राहतो. त्यानुसार सूर्य एका वर्षात बारा राशींचं भ्रमण करतो. सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर क्रियेला संक्रांती असं संबोधलं जातं. सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर सक्रांती येतं. तसंच इतर राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणाऱ्या क्रिया ही त्या राशीतील संक्रांती गणली जाते. आात सूर्यदेव कर्क राशीत एक महिना ठाण मांडल्यावर सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे श्रावणाच्या सुरुवातीलाच सिंह संक्रातीचा योग जुळून येणार आहे. या दिवशी सूर्यदेवाची विधिवत पूजा केल्या काही कामं झटपट पूर्ण होतात. चला जाणून घेऊयात याबाबत…
सिंह संक्रांतील तूप संक्रांती, सिंह संक्रमण अशा नावांनी संबोधलं जातं. या दिवशी सूर्यदेवांसोबत भगवान विष्णु आणि भगवान नरसिंहाची पूजा केल्यास चांगलं फळ मिळतं.
पंचांगानुसार सूर्य 17 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 1 वाजून 23 मिनिटांनी कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह संक्रांती पुण्यकाळ सकाळी 6 वाजून 44 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 44 मिनिटांपर्यंत असेल. हा कालावधी 7 तासांचा असणार आहे. सिंह संक्रांती महापुण्यकाळ सकाळी 11 वाजून 33 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 44 मिनिटांपर्यंत असेल. हा कालावधी 2 तास 11 मिनिटांचा असेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)