Vastu Tips: घरात सुख-समृद्धी पाहिजे आहे? मग वास्तुशास्त्राच्या या नियमाचे अवश्य करा पालन

हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला विशेष महत्त्व आहे. आज आपण काही महत्त्वाचे वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल.

Vastu Tips: घरात सुख-समृद्धी पाहिजे आहे? मग वास्तुशास्त्राच्या या नियमाचे अवश्य करा पालन
वास्तुशास्त्र
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 10:43 AM

मुंबई,  आपल्या घरातील देवघरानंतर स्वयंपाकघर (Kitchen) हे दुसरे पवित्र स्थान मानले जाते. आपण स्वयंपाकघरात अन्न शिजवतो, म्हणून आरोग्याच्या दृष्टीने स्वयंपाकघर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवतो. अनेक संसर्गजन्य रोग अन्न किंवा पाण्याद्वारे पसरतात, म्हणून स्वयंपाकघरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. वास्तुशास्त्रात (Vastushastra) असे मानले जाते की, स्वयंपाकघरातील वास्तूमुळे कुटुंबाचे आरोग्य आणि नातेसंबंध प्रभावित होतात. वास्तूनुसार स्वयंपाकघर बनवताना काही नियमांचे पालन केल्यास अनेक समस्या कमी होऊ शकतात. वास्तुशास्त्रातील स्वयंपाकघरातील काही महत्त्वाचे नियम आपण जाणून घेऊया.

स्वयंपाकघरात गॅस आणि बेसिनचे स्थान

स्वयंपाकघरात गॅसशेगडी आणि सिंक योग्य ठिकाणी असावेत. ते योग्य ठिकाणी नसल्यास घरात भांडणं होतात. गॅस शेगडी  आणि सिंक कधीही एकाच रांगेत नसावे. हे दोन्ही स्वयंपाकघरात वेगवेगळ्या कोपऱ्यात असावेत. वास्तुशास्त्रानुसार  शेगडीची जागा कुटुंबाच्या शांततेवर परिणाम करते.

हे सुद्धा वाचा

स्वयंपाकघर कधीही पायऱ्यांजवळ नसावे

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर कधीही पायऱ्यांजवळ नसावे. हा वास्तुदोष मानला जातो. त्यामुळे घरातील ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. किचन बेसिनच्या नळातून कधीही पाण्याची गळती होता कामा नये, नळातून सतत पाणी गळत राहिल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. स्वयंपाकघरात नेहमी स्वच्छता असावी. गलिच्छ स्वयंपाकघरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

स्वयंपाकघरातील गॅस शेगडी दररोज स्वच्छ करा

गॅस स्टोव्हवर काम करताना ज्यावर अन्न शिजवले जाते, अन्न पडते इ. काम पूर्ण झाल्यानंतर ते लगेच स्वच्छ केले पाहिजे. गॅस स्टोव्ह दररोज स्वच्छ केला पाहिजे. हे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे आणि याशिवाय वास्तुशास्त्रात गॅस शेगडी न साफ ​​करणे अशुभ मानले जाते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.