AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solar Eclipse : कधी लागणार वर्षातले पहिले सूर्यग्रण, ग्रहणात कोणत्या गोष्टींची घ्यावी काळजी

वर्षातील पहिले सूर्यग्रहण चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला होणार आहे. त्याचा सुतक कालावधी 8 एप्रिल रोजी सकाळी 9.12 वाजता सुरू होईल.ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी 12 तास आधी सुरू होतो. तथापि, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक काळ भारतात वैध राहणार नाही.

Solar Eclipse : कधी लागणार वर्षातले पहिले सूर्यग्रण, ग्रहणात कोणत्या गोष्टींची घ्यावी काळजी
सूर्यग्रहणImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 16, 2024 | 3:09 PM
Share

मुंबई : आपल्या जीवनात ग्रह आणि तारे यांचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीत बदल झाल्यामुळे व्यक्तीच्या नशिबात बदल होतात. यापैकी सूर्यग्रहण (Solar Eclipse) आणि चंद्रग्रहण खूप महत्वाचे आहेत. सन 2024 मध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यासारख्या खगोलीय घटना 4 वेळा दिसणार आहेत. यापैकी दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण होतील. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यग्रहण अमावस्या तिथीला होते. वर्षातील पहिले सूर्यग्रहण केव्हा होईल आणि ते कुठे दिसेल हे जाणून घेऊया.

2024 सालातील पहिले सूर्यग्रहण कधी आहे?

2024 सालातील पहिले सूर्यग्रहण सोमवार, 8 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. पहिल्या सूर्यग्रहणाची वेळ – ते 8 एप्रिल रोजी रात्री 09:12 ते 01:25 पर्यंत असेल. अशा प्रकारे सूर्यग्रहणाची एकूण वेळ 4 तास 39 मिनिटे असेल.

वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी?

वर्षातील पहिले सूर्यग्रहण चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला होणार आहे. त्याचा सुतक कालावधी 8 एप्रिल रोजी सकाळी 9.12 वाजता सुरू होईल.ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी 12 तास आधी सुरू होतो. तथापि, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक काळ भारतात वैध राहणार नाही.

वर्षातील पहिले सूर्यग्रहण कुठे दिसणार?

भारतात सोमवार, 8 एप्रिल रोजी होणारे सूर्यग्रहण तुम्हाला पाहता येणार नाही. हे सूर्यग्रहण पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, उत्तर ध्रुव, उत्तर अमेरिका, नैऋत्य युरोप, दक्षिण अमेरिका, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवावर दिसणार आहे.

सूर्यग्रहण काळात काय करू नये?

सूर्यग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नये, तसेच सूर्यग्रहण कधीच डोळ्यांनी पाहू नये, असे सांगितले जाते. सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यग्रहणाचा गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी गच्चीवर जाऊ नये. तसेच ग्रहणकाळात शिवणकाम व विणकाम करू नये. या काळात नखे कापू नयेत. मंदिरात ठेवलेल्या देवाच्या मूर्तीला हात लावू नयेत पण इच्छा असल्यास मंत्रजप करू शकता. ग्रहणकाळात स्वयंपाक वगैरे करू नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा