Surya Gochar 2023: कुंभ राशीत प्रवेशासाठी सूर्यदेव सज्ज, शनिदेवांसोबत मुक्कामामुळे 4 राशींना टेन्शन

Surya Shani Yuti In Kumbh 2023: शनिदेव हे सूर्यदेवांचे पुत्र असून त्यांचं तितकं चांगलं नाही. ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवांना शुभ ग्रह, तर शनिदेवांन पापग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे पिता पुत्रांची युती काही जातकांना अडचणीची ठरणार आहे.

Surya Gochar 2023:  कुंभ राशीत प्रवेशासाठी सूर्यदेव सज्ज, शनिदेवांसोबत मुक्कामामुळे 4 राशींना टेन्शन
Surya Parivartan: सूर्यदेवांसोबत शनिचं विळा भोपळ्याचं नातं, कुंभ गोचरामुळे चार राशींच्या अडचणीत होणार वाढ
| Updated on: Feb 09, 2023 | 2:21 PM

मुंबई- ज्योतिषशास्त्रातीली गोचर कुंडलीतील गणितं दिवसागणिक बदलत असतात. कधी या राशींना, तर कधी त्या राशींना चांगले दिवस येतात. त्यामुळे गोचर कुंडलीनुसार कोणता ग्रह कोणत्या स्थानात विराजमान आहे आणि त्या ग्रहाचा स्वभावधर्म कसा आहे यावर भाकीत वर्तवलं जातं. ग्रहमंडळात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं स्थान आहे. त्यामुळे काही ग्रहांचं एकमेकांसोबत पटतं, तर काही ग्रहांचं पटत नाही. असंच काहीसं नात सूर्य आणि शनिदेवांमध्ये आहे. पितापुत्र जरी असले तरी नात्यात तितका गोडवा नाही. त्यामुळे या दोघांची कुंभ राशीत होणारी युती काही जातकांना त्रासदायक ठरणार आहे. सूर्यदेव 13 फेब्रुवारी 2023 रोजी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. सकाळी 9 वाजून 57 मिनिटांनी कुंभ राशीत विराजमान होतील. या राशीत अडीच वर्षांसाठी शनिदेव ठाण मांडू आहेत. त्यामुळे कुंभ राशीत सूर्य आणि शनिदेवांची युती महिनाभर तरी असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या युतीचा चार राशींना फटका बसणार आहे. त्यामुळे महिनाभर तरी या राशीच्या लोकांनी सावध पावलं उचलणं गरजेचं आहे.

सूर्य आणि शनि युती राशीतील स्थान

  • कुंभ- पहिल्या स्थानात
  • मकर- दुसऱ्या स्थानात
  • धनु- तिसऱ्या स्थानात
  • वृश्चिक- चौथ्या स्थानात
  • तूळ- पाचव्या स्थानात
  • कन्या- सहाव्या स्थानात
  • सिंह- सातव्या स्थानात
  • कर्क- आठव्या स्थानात
  • मिथुन- नवव्या स्थानात
  • वृषभ- दहाव्या स्थानात
  • मेष- अकराव्या स्थानात
  • मीन- बाराव्या स्थानात

कर्क- या राशीच्या आठव्या स्थानात सूर्य आणि शनिची युती होत आहे. जातकांना यापूर्वीच अडीचकी सुरु आहे. त्यामुळे या काळात काळजी घेणं आवश्यक आहे. काळजीपूर्वक गुंतवणूक करणं गरजेचं आहे. आर्थिक नुकसान या काळात होण्याची दाट शक्यता आहे. आरोग्यविषयक समस्याही या काळात जाणवेल. कौटुंबिक कलहात महिनाभर वाढ झाल्याचं दिसून येईल. त्यामुळे सूर्यदेव महिनाभर या राशीत असल्याने काळजी घेणं आवश्यक आहे.

सिंह- या राशीच्या सातव्या स्थानात सूर्यदेव आणि शनिची युती होत आहे. त्यामुळे या काळात सांभाळून राहणं आवश्यक आहे. व्यवसाय आणि नोकरीच्या ठिकाणी फटका बसू शकतो. तसेच मनासारखं काम होणार नाही. तसेच आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत वादविवाद वाढेल. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.

कुंभ- या राशीच्या जातकांना शनिची साडेसाती सुरु आहे. त्यात सूर्यदेव येणार असल्याने अडचणीत वाढ होणार आहे. त्यामुळे या काळात रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी झालेल्या बदलामुळे चिंता वाढू शकते. भागीदारीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळात फटका बसू शकतो.प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्याची योजना असल्यास सध्या थांबा, कारण आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

मीन-या राशीच्या जातकांना साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. त्यात शनि आणि सूर्यदेव बाराव्या स्थानात विराजमान असणार आहेत. त्यामुळे या काळात आरोग्यविषयक समस्या जाणवू शकतात. डोकंदुखी, डोळ्यांचे आजार, सर्दी खोकला यासारख्या समस्या जाणवू शकता. या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. उत्पन्नात कमतरता दिसून येईल. विनाकारण मानसिक तणाव वाढू शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)