Surya Grahan 2023 : सूर्य ग्रहणाच्या काळात या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध, किती तारखेला लागणार ग्रहण?
ज्योतिषांच्या मते, ग्रहण काळात आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. याशिवाय, सर्व 12 राशींवर देखील याचा परिणाम होतो.

मुंबई : धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यग्रहण (Surya Grahan 2023) अमावस्येला होते आणि चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी होते. यावर्षी वैशाख पौर्णिमेला वर्षातील पहिले चंद्रग्रहण (Chandra Grahan 2023) होणार आहे. 2023 सालातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसले तरी ते येथे वैध मानले जाणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हे सूर्यग्रहण खूप महत्वाचे मानले जाते. ज्योतिषांच्या मते, ग्रहण काळात आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. याशिवाय, सर्व 12 राशींवर देखील याचा परिणाम होतो. सूर्यग्रहणाचा प्रभाव काही राशींवर शुभ असतो, तर दुसरीकडे काही राशींवरही याचा नकारात्मक प्रभाव पडतो, चला तर मग जाणून घेऊया वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणाचा अशुभ प्रभाव कोणत्या राशींवर पडेल.
या राशींवर दिसून येईल नकारात्मक प्रभाव
मेष
वर्षातील पहिले सूर्यग्रहण तुमच्यासाठी अशुभ राहील आणि त्याचे विपरीत परिणाम दिसून येतील. या दरम्यान तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. जोडीदारासोबत वादाच्या प्रसंगापासून दूर राहा. तसेच, तुमची आर्थिक बाजू कमकुवत असू शकते, ज्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
कन्या
वर्षातील पहिले सूर्यग्रहण कन्या राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. या दरम्यान वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे. हे सूर्यग्रहण तुमच्यासाठी मानसिक तणाव आणि वेदना देखील देऊ शकते. म्हणूनच थोडं विचारपूर्वक बोलण्याची आणि विचारपूर्वक खर्च करण्याची गरज आहे.
तूळ
सूर्यग्रहणाचा नकारात्मक प्रभाव तूळ राशीच्या लोकांवर दिसेल. या काळात धनहानी होण्याची शक्यता आहे. कोणालाही कर्ज देऊ नका आणि कोणतीही मोठी गुंतवणूक करू नका. पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा. भविष्यात त्याची गरज भासू शकते. कुटुंबात वादाची परिस्थिती टाळा. आरोग्याची काळजी घ्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
