1 ऑगस्टपासून शनि आणि शुक्राची तीन राशींवर असेल कृपा, चंद्र राशीनुसार मिळणार लाभ

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती खूपच महत्त्वाची असते. त्यामुळे ग्रहांची स्थिती बदलली त्याचा परिणाम राशीचक्रावर होतो. असंच काहीसं होणार आहे. कारण शनि आणि शुक्राची युती होणार आहे.

1 ऑगस्टपासून शनि आणि शुक्राची तीन राशींवर असेल कृपा, चंद्र राशीनुसार मिळणार लाभ
1 ऑगस्टपासून शनि आणि शुक्राची तीन राशींवर असेल कृपा, चंद्र राशीनुसार मिळणार लाभ
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Jul 25, 2025 | 3:39 PM

ज्योतिषशास्त्रानुसार, राशीचक्रातील काही ग्रहांचं एकमेकांशी जमतं, तर काही राशींचं जमत नाही. त्यामुळे ग्रहांच्या गोचरानंतर युती आघाडीचा प्रभाव राशीचक्रावर पडतो. दैत्यगुरू शुक्र ग्रह जुलै महिन्यात राशी बदल करणार आहे. शुक्र सध्या वृषभ राशीत असून 26 जुलैला मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 1 ऑगस्टला शुक्र आणि शनिमुळे केंद्र योग तयार होणार आहे. कारण शनि देव मिथुन राशीत आहेत. दोन्ही एकमेकांपासून तिसऱ्या आणि नवव्या स्थानात विराजमान होणार आहेत. 1 ऑगस्टला शुक्र आणि शनि संध्याकाळी 7 वाजून 1 मिनिटांनी एकमेकांपासून 90 डिग्रीवर असतील. त्यामुळे केंद्र योग तयार आहे. सध्या शनिदेव वक्री स्थितीत असून मीन राशीत आहेत. त्यामुळे हा योग काही राशींसाठी लाभदायी ठरणार आहे. तीन राशीच्या जातकांना या स्थितीचा लाभ मिळणार आहे. नोकरी उद्योग-धंद्यात यश मिळू शकते. चंद्र राशीनुसार या स्थितीचा लाभ कोणत्या राशींना मिळणार ते जाणून घेऊयात.

मिथुन : या राशीत शुक्र ग्रह विराजमान असणार आहेत. आत्मविश्वास द्विगुणित होईल. तसेच भौतिक सुख अनुभवता येईल. त्यामुळे या राशीच्या जातकांना या स्थितीमुळे आर्थिक लाभ मिळू शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला लाभ मिळू शकतो. तसेच गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामंही मार्गी लागतील. वाहन खरेदी करण्यासाठी हा अवधी उत्तम असेल.

मेष : या राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. पण शनि वक्री असल्याने काही अंशी प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे या स्थितीचा फायदा या राशीला मिळणार आहे. खासकरून न्यायालयीन प्रकरणात यश मिळू शकते. गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे मिळू शकतात. तुम्ही भागीदारीचा धंदा करत असाल तर त्यातून चांगला परतावा मिळू शकतो. करिअरमध्ये तुम्ही नवी उंची गाठाल.

कुंभ : या राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. त्यामुळे शनिदेवांची विशेष कृपा असणार आहे. शनि शुक्रामुळे या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. वैवाहीक जीवनातील अडचणी दूर होतील. गेल्या काही दिवसांपासून असलेली आरोग्यविषयक समस्याही दूर होईल. मुलांच्या अभ्यासातील प्रगती दिसून येईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना या काळात चांगली नोकरी मिळू शकते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)