AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 10 जून 2023, या राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा होणार पूर्ण

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. वादविवाद संपुष्टात येतील.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 10 जून 2023, या राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा होणार पूर्ण
राशी भविष्यImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 10, 2023 | 12:01 AM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashi bhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

आजचे बारा राशींचे भविष्य

मेष

केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. नोकरीत बढ़ती मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. नातेवाईकांशी संबंधात स्नेह वाढेल. संपत्तीबाबत असलेल्या कामात केलेली धावपळ फायदेशीर राहिल. रोजगारात नवीन योजना राबवाल. व्यवसायात आर्थिक लाभ वाढणार आहे. उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक सुख-शांती मिळेल. नवीन घर वाहन खरेदीचा योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. प्रवासातून आर्थिक लाभ होतील.

वृषभ

रोजगारात आर्थिक लाभ होईल. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. आपली स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक सामजस्य राहील. व्यापारात वाढ होवुन अनुकुल स्थिती राहणार आहे. वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून कामाला लागा. घर वाहन खरेदीचा योग आहे. वडिलांच्या सहकार्याने व्यापार व्यवसायातील अडचणी दुर होतील. मानसिक स्वास्थ लाभेल.

मिथुन

मोठ्यांची मर्जी व मान राखाल. कुटुंबातील सुखद वातावरण निर्माण होईल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे.नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल.

कर्क

स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. व्यापारात लक्षपूर्वक नियोजन केल्यात वाढ होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. जोडीदार नोकरीत असेल तर प्रमोशन बढतीचे योग आहेत. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. कला क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मान व पुरस्कार मिळतील. मित्र मैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. सफलतापूर्ण दिवस आहे.

सिंह

कामकाजात व्यत्यय निर्माण होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताणतणात्मक राहिल. रोजगारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. शत्रुपक्ष वरचढ राहिल. आपल्या कामात मानसिक दृष्या पीडादायक दिनमान आहे. शासकीय कर्मचारी असाल तर खोट्या प्रकरणात गुंतले जाण्याची शक्यता आहे. सावधानीपुर्वक वाटचाल करावी.

कन्या

नोकरीत वरिष्ठ सदस्यांसोबत विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका. व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जामीन राहू नका अन्यथा फसवणुक होईल. आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. शक्यतो आज प्रवास टाळावा.

तुला

राजाश्रय मिळेल. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. नवीन व्यवसायिक प्रस्ताव येतील. धनप्राप्तीत वाढ होईल. कौटुंबिक सुखशांती आनंददायक वातावरण राहिल. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांकडून आर्थिक सहकार्य लाभेल. राजकारणातील व्यक्तींना पदप्राप्ती आणि प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य प्रकृती स्थिर व उत्साहपूर्ण राहील. समाधानकारक दिनमान असेल.

वृश्चिक

व्यापारात योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल. वेळेचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या. नोकरीमध्ये केलेल्या कामाचे महत्व वाढेल. सामाजिक कार्यात नवीन योजनेतून लाभ होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. नोकरीत नवीन संकल्पना मांडाल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. व्यवहार कुशलतेमुळे भागीदारीतील संबंध अधिक दृढ होतील. शैक्षणिक कार्यात सहभाग घ्याल. कुटुंबात मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील.

धनु

नोकरीत कामाचा ताण वाढेल. नोकरीच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. स्थानबदलाची शक्यता आहे. रागाचा अतिरेक टाळावा. आळसाचा अतिरेक होईल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. मनात नैराश्य व असमाधानी भावना निर्माण होऊ शकते. मानसिक क्लेश अस्वस्थता जाणवेल. व्यापारात जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. मानसिक शारिरिक आरोग्याबाबत अडचणी अदभवू शकतात. कौटुंबिक पातळीवर अनियोजित खर्च वाढेल.

मकर

मितभाषी रहा अन्यथा अडचणीचा सामना करावा लागेल. व्यापारात प्रतिकुल परिस्थिती निर्माण होईल. भागीदारासोबत सामंजस्यपूर्ण व्यवहार ठेवा. नोकरीत आपल्या मनाच्या विरोधात वातावरण निर्माण होईल. आपले विरोधक हितशत्रुकडून आपल्या विरोधात वातावरण तयार केले जाईल. मन लावून काम करा. व्यापारात नवीन योजना असतील तरच आज टाळा. कुंटुबाकडून सहकार्य लाभणार नाही. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करु नका. प्रवासातून हानी संभवते.

कुंभ

मित्रमैत्रिणीच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. वादविवाद संपुष्टात येतील. नोकरीत मनासारखी बढ़ती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. कामाबाबत विसंबून राहु नका. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहिल. प्रवास सुखकर होईल. प्रवासातून आर्थिक लाभाची शक्यता आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य मिळेल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या.

मीन

व्यापारात योजना गुप्तपणे पार पाडा. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल.कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसाया निमित्त प्रवास होईल. प्रवासातून लाभ होतील. शासकीय कामकाजासाठी शुभदिवस आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...