Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 31 मार्च 2023, या राशीच्या लोकांच्या महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीचे लोकं कायदेशीर पेचप्रसंगात अडकले जाण्याची शक्यता आहे.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 31 मार्च 2023, या राशीच्या लोकांच्या महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील
राशी भविष्यImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 12:05 AM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

आजचे बारा राशींचे भविष्य

हे सुद्धा वाचा

मेष

नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार यासाठी अनुकुलता राहिल. शुभवार्ता ऐकायला मिळतील. जुन्या जागेचा प्रश्न निकालात निघेल. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील. संततीची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल रहिल. चांगल्या भावनेने काम करा. आपल्या अंगीभूत कलेसाठी चांगले वातावरण आहे. व्यापारात आर्थिक उन्नती होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा.यश लाभेल.

वृषभ

कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमला या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. नोकरीत बौद्धिक चातुर्याने आपण हाती घेतलेल्या कामात सफलता मिळवाल. उद्योग व्यापार तेजील राहिल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. भाऊबहिणीसी सलोख्याचे संबंध राहतील. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे वातावरण राहील. प्रयत्न केल्यास थकित रक्कम प्राप्त होईल. आपली आर्थिक बाजु भक्कम राहिल.

मिथुन

आत्मविश्वास वाढीस लागल्याने अवघड समस्याही सहज सोडवाल. आजचे निर्णय महत्वपूर्ण ठरतील. भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील. सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका घ्याल. शासकीय पोलिस यंत्रणेतील व्यक्तींना उत्तम दिनमान आहे. व्यापार-व्यवसायात तेजी राहिल. मुलांच्या हट्टापायी चैनीच्या वस्तूसाठी खर्च करावा लागेल. समाजात केलेल्या कार्याची स्तुती होईल. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. कौटुंबिक सौख्य राहिल. आरोग्य उत्तम राहणार आहे. परदेश प्रवास होईल. प्रवासातून आर्थिक लाभ होईल.

कर्क

नोकरीत विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका. व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जामीन राहू नका अन्यथा फसवणुक होईल. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहिल. शारिरिक व्याधी उद्‌भवतील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. व्यसनापासुन दुर रहा. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह

आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील. विद्यार्थ्याच्या विद्याभ्यासात प्रगती होईल. संततीबद्दल समाधान व्यक्त कराल. गृहस्थी जीवन जोडीदाराकडून आणि कुटुंबातील वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. आपली कामे नियोजनात्मक पद्धतीने सुरुळीत घार पाडाल. व्यापारात प्रगतीकारक दिवस असुन अचानक आर्थिक लाभ घडतील. आज केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. आरोग्य उत्तम राहील.

कन्या

पती पत्नीत स्नेह निर्माण होईल. महिला वर्गाकडून विशेष सहकार्य लाभेल. दुरवरचे प्रवास हितकारक ठरतील. आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी वेळ मिळेल. आनंद प्राप्त होईल. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील. मानसिक सौख्य लाभेल. आपला छंद जोपासाल. नवनवीन कल्पना सुचतील. दिनमान उत्तम असल्याने अपेक्षेप्रमाणे लाभ होईल. नोकरी शासकीय कामे राजकीय क्षेत्रातील व्यक्तीना आज अनुकुलता लाभेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.

तुला

नोकरदारास सलोख्याचे वातावरण अनुभवता येईल. धार्मिक अध्यात्मिक प्रसंगातून आत्मविश्वास मिळवू शकाल. व्यापारिक प्रकरणात जवाबदारी वाढणार आहे. आपसातील वाढ समझदाराने मिटवा. भावडांशी वादविवाद टाळा. सामाजिक कार्यक्रम साहित्यिक चळवळ व्यासपीठ इत्यादी माध्यमातून आपला नावलौकिकेत वाढ होईल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी रहाल.आध्यात्मिक कार्य घडतील. देवधर्म तीर्थक्षेत्री यात्रा घडु शकतात.

वृश्चिक

नोकरीत केलेली चुकू महागात पडेल. कायदेशीर कारवाईचा त्रास होऊ शकतो. शासकीय सेवेत प्रलोभनांना बळी पडू नये. कौटुंबिक पातळीवर सदस्यांशी सुसंवाद ठेवा. व्यापारात कर्जप्रकरणे नामंजूर होतील. कर्ज घेणे देणे टाळावे. आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. हानीकारण दिनमान आहे. लेखी कागदपत्राशिवाय मोठे व्यवहार टाळावेत. शक्यतो प्रवास टाळावेत. वाहने सावकाश चालवा.अपघात भय संभवते. शारिरिक व्याधी कडे दुर्लक्ष करू नये. आहारावर नियंत्रण ठेवा. काळजी घ्या.

धनु

व्यापारात थोड्याफार अडचणी निर्माण होतील. हाती कमी पैसा असल्याने योजना अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. वास्तविकतेला महत्व देणे गरजेचे आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. लाभदायक घटना घडतील. मित्रमैत्रिण नातेवाईकांकडून सहकार्य लागेल. नोकरदारांना वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. महत्वाची कामे तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या वेळेस पुर्ण होतील.

मकर

हातून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांकडून कामाचा दबाब राहील. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा. अन्यथा मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. कायदेशीर पेचप्रसंगात अडकले जाण्याची शक्यता आहे. कायदा व नियमच्या विरोधात काम केल्यास शिक्षा होण्याची शक्यता आहे. कायदेशीर व्यवहार करा.

कुंभ

आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहे. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. साहित्य कला क्षेत्रातील मंडळीना फारच चांगला फलदायी दिवस आहे. मान-सन्मान प्रतिष्ठा प्राप्त वाढेल. कर्तुत्वात वाढ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. व्यापारीवर्गाला आर्थिक फायदयाचा दिवस आहे. आज आनंदी व ऊत्साही दिवस राहील. मनात प्रसन्नता असेल. आईच्या आरोग्याची काळजी मात्र घ्या. प्रतिष्ठा वाढेल.

मीन

नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी रहिल. भाषाभ्यास ग्रंथलिखाणास उत्तम दिवस आहे. विद्याभ्यासात प्रगती राहिल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.