AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 4 एप्रिल 2023, या राशीचे लोकं नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त करतील

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांनी अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 4 एप्रिल 2023, या राशीचे लोकं नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त करतील
राशी भविष्यImage Credit source: Tv9 Marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Apr 04, 2023 | 12:18 AM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

आजचे बारा राशींचे भविष्य

मेष

नोकरी व्यापारात परस्परांत सहकार्याच्या भावनेतून राहा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिड पणा राहिल. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्‌भवतील. कुटुंबापासुन दुर जाल. अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक आज करू नये. मित्रमैत्रिण नातेवाईकांसोबत सलोख्याने वागा. प्रकृती वर लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त ताण जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. विरोधकाच्या कारवायात वाढ होईल. आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्या.

वृषभ

वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. आरोग्यही उत्तम राहील. शुभ दिनमान असेल. प्रेमप्रकरणात स्नेह वाढेल. विवाह बद्दल इच्छित असणाऱ्याचे विवाह खात्रीशीर जुळतील. संततीकडून समाधान सुख लाभेल. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल.

मिथुन

नवनवीन कल्पना सुचतील. आणि त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा.दाम्पत्य जीवन सुखी रहिल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आरोग्य उत्तम राहिल. कुटुंबात मंगल कार्य घडतील. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहिल. आपल्या कार्यात यश आणि प्रसिद्धी लाभेल.

कर्क

स्त्रींयासोबत सन्मानानं आदरभावयुक्त व्यवहार ठेवावेत. नोकरी मात्र बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. शासकीय कामकाजात अडचणीत आणणारे दिनमान राहील. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा. व्यावसायिक स्पर्धेत अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. निरर्थक कामात वेळ वाया घालवाल. स्वःतावर नियंत्रण ठेवा. मनात सदैव नकारात्मकता राहण्याची शक्यता आहे. व्यापारात काळजीपूर्वक व्यवहार करावेत.

सिंह

वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभेल. व्यापारीवर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. पोलिस सैन्यातील व्यक्तीकरीता कर्मस्थ मंगळामुळे पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल. गृहस्थी सौख्य लाभेल. एकंदरीत आजचं दिनमान उत्तम आहे. आकस्मिक धनलाभ होईल. प्रवासातून आर्थिक लाभ होतील.

कन्या

स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कार्याचे कौतुक होऊन समाजात मानसन्मान वाढेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. वैवाहिक जीवनात पत्नीचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने आपले मनोबल वाढवणारा दिवस राहील. प्रवास लाभदायक होतील. वाचनाची गोडी लागेल.

तुला

चुकीच्या संगतीमुळे आळ येतील. नोकरी व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. शारिरिक इजा अथवा जुने आजार त्रास देतील. कुंटुंबातील वरिष्ठमंडळीच्या प्रकृतीकडे लक्ष दया. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा.

वृश्चिक

वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. राजकीय सामाजिक कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे. सरकारी योजना आमलांत आणल्या जातील. कलाकाराचा मानसन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. प्रकृती स्थिर राहिल. नवीन कार्यास आंरभ करण्यासाठी दिवस योग्य आहे. व्यवसायिक प्रवास होईल. प्रवासातून आर्थिक लाभ होतील.

धनु

आपल्या कल्पनांना साथीदारांकडून साथ लागेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकाकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहिल. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहिल.स्वभावातील गुणदोषं मात्र टाळावेत. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. शासकिय योजनेतून लाभ होईल. मनोबल उत्तम राहील. अचानक लाभ होईल.

मकर

नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. बढतीची संधी आहे. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक जिवन आनंदी राहिल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संततीविषयी चिंता मिटेल. कोर्टकचेरीची प्रकरण असतील तर निकाल आपल्या बाजूने लागेल. जमीन खरेदी-विक्रीतून अधिक लाभ होईल. शिक्षक वर्गाचा मान-सम्मान वाढेल.आजचे दिनमान सफलतादायक आहे. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींच्या मानधनात वाढ होईल. मानसन्मान आणि पुरस्कार प्रसिद्धी मिळेल.

कुंभ

मोठ्या व मान्यवरांची नाराजी ओढवून घेऊ नये अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहिल. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहिल. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही. याबाबत काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक कामात वेळ वाया घालवू नका. मागील स्मृती उजाळल्याने दुखः होईल. शक्यतो प्रवास टाळा. अपघात दुघर्टना घडण्याची शक्यता आहे.

मीन

आर्थिक सहकार्य लागेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहिल. व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. विरोधकावर मात कराल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. नवीन घर वाहन खरेदीस चांगला दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. लाभदायक दिवस आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?