Vastu Tips : झाडू मारताना ‘या’ चुका करु नका, नाहीतर कंगाल व्हाल

Vastu Tips : झाडू मारताना 'या' चुका करु नका, नाहीतर कंगाल व्हाल
केवळ कचराच नाही, घराची गरिबीही दूर करते झाडू

वास्तूशास्त्रानुसार अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्यामुळे आपल्यावर लक्ष्मीदेवता नाराज होऊ शकते. (Vaastu Shastra broom cleanliness laxmi)

prajwal dhage

|

Feb 21, 2021 | 10:02 AM

मुंबई : स्वच्छतेचं महत्त्व किती आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. जेवढी स्वच्छता तेवढी समृद्धी आपल्या घरात नांदते असे म्हटले जाते. मात्र, वास्तूशास्त्रानुसार अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. वास्तूशास्त्रानुसार आपण काही गोष्टी करणं हमखास टाळलं पाहिजे. (Vaastu Shastra tips of broom cleanliness and laxmi)

झाडूच्या बाबतीत या गोष्टींची काळजी घ्या

वास्तूशास्त्रात झाडू आणि साफसफाईबाबत काही गोष्टी नियम आहेत. असं म्हटलं जातं की. झाडूचा वापर कसा करावा हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. पण झाडूच्या बाबतीत आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे वास्तूशास्त्रानुसार आपल्याला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. झाडूमध्ये लक्ष्मी म्हणचे संपत्ती आणि समृद्धी असते. त्यामुळे स्वच्छता, झाडू आणि वास्तुशास्त्राच्या बाबतीत आपण काही काळजी घेणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार झाड़ू नेहमी लपवून ठेवला पाहिजे. तो बाहेरून येणाऱ्या लोकांना कधीही दिसू नये. तसेच, बेडरुममध्येसुद्धा झाडू कधीही ठेवू नये.

वास्तुशास्त्रानुसार झाड़ूला पाय मारु नये. तसे केले तर माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. असं म्हटलं जातं की स्वच्छता हे लक्ष्मीचे प्रतिक आहे. त्यामुळे जेथे साफसफाई नसते तिथे लक्ष्मी नसते असे म्हटले जाते.

स्वप्नात झाडू आल्यावर धनलाभ होणार

असं म्हटलं जातं की सुर्यास्त झाल्यानंतर घराला झाडू मारणे अशुभ असते. जर तसं केलं तर घरात पैशांची चणचण भासू शकते. तसेच, झाडू कधीही उभा ठेवू नये. त्यामुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो, असेही म्हटले जाते. सुर्योदयाच्या वेळी घराला साफ केल्यानंतर लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच किचनमध्येसुद्धा झाडू ठेवू नये. तसे केल्यास घरात अन्नाची कमी निर्माण होऊ शकते, असे म्हटले जाते.

इतर बातम्या :

VIDEO : काय रे भाऊ, ही ‘पावरी’ भानगड काय? आता पाकिस्तानी अभिनेत्रीचा व्हिडीओ समोर

Shocking Video! लाईव्ह रिपोर्टिंग करताना चोरट्याने रोखली पत्रकारावर बंदूक, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

Kim Kardashian Divorce | अमेरिकन सेलिब्रिटी किम कार्दशियनचा घटस्फोटासाठी अर्ज

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें