VIDEO : काय रे भाऊ, ही ‘पावरी’ भानगड काय? आता पाकिस्तानी अभिनेत्रीचा व्हिडीओ समोर

सोशल मीडियावर सध्या 'पावरी हो रही है' हे गाणं सध्या प्रचंड धुमाकूळ घालत आहे (Mahira Khan enjoys dancing to pawri ho rahi hai video goes viral)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:00 PM, 20 Feb 2021
VIDEO : काय रे भाऊ, ही 'पावरी' भानगड काय? आता पाकिस्तानी अभिनेत्रीचा व्हिडीओ समोर

मुंबई : सोशल मीडियावर सध्या ‘पावरी हो रही है‘ हे गाणं सध्या प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या गाण्याची प्रसिद्धी इतकी वाढलीय की, पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खान हीला देखील या गाण्यावर नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही. माहिरा आपल्या मैत्रिणींसोबत या गाण्यावर थिरकली आहे. तिने हा व्हिडीओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. तिच्या या गाण्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. लोकांना माहिराचा मैत्रिणींसोबत नृत्य करण्याचा व्हिडीओ प्रचंड आवडत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahira Khan (@mahirahkhan)

पावरी नेमकी भानगड काय?

पाकिस्तानच्या दनानीर मुबीर नावाच्या तरुणीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत ती आपल्या मैत्रीणींसोबत पार्टी करत होती. या व्हिडीओत ती ‘ये हमारी कार है, ये हम है, और ये हमारी पावरी हो रही है’, असं म्हणताना दिसली. पार्टीचा उल्लेख पावरी असा केल्याने सोशल मीडियावर तिची प्रचंड खिल्ली उडवली गेली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dananeer | 🇵🇰 (@dananeerr)

भारतात ‘रसोडे मे कौन था’ असं रॅप साँग तयार करणारा म्युजिक कम्पोसर यशराज मुखाते याने तर दनानीर मुबीरच्या डॉयलॉगवर रॅप साँगच तयार केलं. या गाण्यात त्याने “ये हमारी चेअर है, ये हमारा चमच है”, असे वाक्य आणखी जोडले. त्याचं हे रॅप साँग सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. लोक या गाण्याचा वापर करुन वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ बनवत आहेत.

पावरीचा मुख्य व्हिडीओ दानानीर मुबीन हीने 6 फेब्रुवारी रोजी इन्साग्रामवर शेअर केला होता. तिने पार्टीचा शब्दोच्चार पावरी केल्याने तिला अनेकांनी ट्रोल केला. याशिवाय अनेकांना हा व्हिडीओ आवडला. त्यामुळे सोशल मीडियावर पावरीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.

संबंधित बातमी :

VIDEO : गुगल मिटींग सुरु आणि बायकोला किस करण्याचा मोह, कॅमेऱ्यात कैद ‘तो’ क्षण

पार्टीला ‘पावरी’ म्हणणारी पाकिस्तानी तरुणी प्रचंड ट्रोल, ‘PIB फॅक्ट चेक’चाही मौका पाहून चौका!