Kim Kardashian Divorce | अमेरिकन सेलिब्रिटी किम कार्दशियनचा घटस्फोटासाठी अर्ज

Kim Kardashian Divorce | अमेरिकन सेलिब्रिटी किम कार्दशियनचा घटस्फोटासाठी अर्ज
किम कार्दशियन आणि कान्ये वेस्ट

मालमत्तेच्या वाटणीबाबतही किम आणि कान्ये यांच्यात सामंजस्याने वाटाघाटी झाल्याची माहिती आहे. ( Kim Kardashian Kanye West divorce)

अनिश बेंद्रे

|

Feb 20, 2021 | 8:06 AM

न्यूयॉर्क : प्रसिद्ध अमेरिकन सेलिब्रिटी किम कार्दशियन (Kim Kardashian) हिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. किम आणि पती कान्ये वेस्ट (Kanye West) यांच्या नात्यात सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा काही महिन्यांपासून होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार किमने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र किम कार्दशियन आणि कान्ये वेस्ट यांच्यात घटस्फोटानंतरही मैत्रीपूर्ण संबंध राहण्याची शक्यता वर्तवली जाते. (American Celebrity Couple Kim Kardashian and Kanye West files for divorce)

किमने आपल्या चार मुलांच्या जॉईंट कायदेशीर ताब्याची मागणी केली आहे. कान्येलाही किमचा पर्याय मान्य असल्याचं बोललं जातं. मालमत्तेच्या वाटणीबाबतही किम आणि कान्ये यांच्यात सामंजस्याने वाटाघाटी झाल्याची माहिती आहे. गेल्या काही काळात मतभेद वाढल्याने त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

कोण आहे किम कार्दशियन? (Who is Kim Kardashian)

सोशल मीडियावर किम कार्दशियनच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते. किमला फॉलो करणाऱ्या फॅन्सची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. किमने पोस्ट शेअर करताच त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा अक्षरशः पाऊस पडतो.

किम चार मुलांसह लॉस अँजेलसमध्ये

रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन सध्या आपल्या चार मुलांसह लॉस अँजेलसमध्ये राहत असल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. तर पती आणि रॅपर कान्ये वेस्ट हा त्याच्या फार्महाऊसवर राहतो. किम-कान्येच्या लग्नाला सहा वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. 2014 मध्ये दोघं विवाहबंधनात अडकले होते.

किम पहिल्यांदा गर्भवती असताना झालेल्या गर्भपाताची कहाणी कान्ये वेस्टने एका रिअॅलिटी शोमध्ये सांगितली होती. ही आठवण सांगताना पहाडासारख्या कान्येला हुंदका अनावर झाला होता.

कधी बिनसलं?

2020 च्या उत्तरार्धात किम आणि कान्ये यांच्यात बिनसल्याचं मानलं जातं. 4 जुलैला कान्ये वेस्टने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. राजकारण आणि जीवनशैलीच्या मुद्द्यावरुन दोघांमध्ये खटके उडत असल्याची चर्चा आहे.

(American Celebrity Couple Kim Kardashian and Kanye West files for divorce)
View this post on Instagram

A post shared by Kim Kardashian West (@kimkardashian)

(American Celebrity Couple Kim Kardashian and Kanye West files for divorce)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें