Kim Kardashian | सेलिब्रिटी कपल किम कार्दशियन-कान्ये वेस्ट घटस्फोटाच्या वाटेवर?

Kim Kardashian | सेलिब्रिटी कपल किम कार्दशियन-कान्ये वेस्ट घटस्फोटाच्या वाटेवर?

अभिनेत्री किम कार्दशियन (Kim Kardashian) आणि रॅपर कान्ये वेस्ट (Kanye West) लवकरच घटस्फोट (divorce) घेणार असल्याची चर्चा आहे

अनिश बेंद्रे

|

Jan 06, 2021 | 2:59 PM

न्यूयॉर्क : प्रसिद्ध अमेरिकन सेलिब्रिटी कपल किम कार्दशियन (Kim Kardashian) आणि कान्ये वेस्ट (Kanye West) यांच्यात सारं काही आलबेल नसल्याचं बोललं जातं. मीडिया रिपोर्ट्सनुसार किम आणि कान्ये लवकरच घटस्फोट घेण्याची शक्यता आहे. किम कार्दशियन आणि कान्ये वेस्ट यांना आणखी काळ एकत्र राहण्याची इच्छा नाही. त्यामुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं. (American Celebrity Couple Kim Kardashian and Kanye West may file divorce)

सोशल मीडियावर किम कार्दशियनच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते. किमला फॉलो करणाऱ्या फॅन्सची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. किमने पोस्ट शेअर करताच त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा अक्षरशः पाऊस पडतो.

रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन सध्या आपल्या चार मुलांसह लॉस अँजेलसमध्ये राहत असल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. तर पती आणि रॅपर कान्ये वेस्ट हा त्याच्या फार्महाऊसवर राहतो. किम-कान्येच्या लग्नाला सहा वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. 2014 मध्ये दोघं विवाहबंधनात अडकले होते.

गेल्या काही काळात मतभेद वाढल्याने त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. कान्ये वेस्ट घटस्फोटाचा अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.

किम-कान्ये यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचं वृत्त पसरताच चाहते खट्टू झाले आहेत. किमने गेल्या काही दिवसांपासून पतीसोबत एकही फोटो न टाकल्यामुळे काही जणांच्या मनात आधीच शंकेची पाल चुकचुकली होती. आता किम आणि कान्ये यांचं मत परिवर्तन व्हावं, यासाठी फॅन्स प्रार्थना करत आहेत.

संबंधित बातम्या :

बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदे बनला ‘साईशा शिंदे’! सोशल मीडियाद्वारे केला खुलासा..

लडाखमध्ये मायनस 33 डिग्री तापमान; अमिताभ बच्चन म्हणतात थर्मल सूट घालूनही…

(American Celebrity Couple Kim Kardashian and Kanye West may file divorce)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें